विनापरवाना बियाणे विक्रीतून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:08 AM2018-03-16T00:08:19+5:302018-03-16T00:08:19+5:30

नाशिकरोड : बियाणे विक्रीचा परवाना असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करून शेतकºयांसह शासनाची फसवणूक करणाºया सामनगाव रोडवरील प्रगत कृषी सेवा केंद्राच्या तिघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Cheating from sale of unprotected seeds | विनापरवाना बियाणे विक्रीतून फसवणूक

विनापरवाना बियाणे विक्रीतून फसवणूक

Next
ठळक मुद्दे नाशिकरोड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल राज्यातील शेतकºयांची फसवूणक

नाशिकरोड : बियाणे विक्रीचा परवाना असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करून शेतकºयांसह शासनाची फसवणूक करणाºया सामनगाव रोडवरील प्रगत कृषी सेवा केंद्राच्या तिघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अण्णासाहेब नामदेव साठे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सिन्नरफाटा सामनगावरोड परिसरातील औटे मळ्यात प्रगत कृषी सेवा केंद्र आहे़ या कृषी सेवा केंद्राचे संचालक संशयित जितेंद्र वेलजीभाई कटारिया, हर्ष अशोक सोनजे आणि प्रताप विठ्ठल जाधव यांनी बियाणे विक्रीचा कायदेशीर परवाना असल्याचे भासवून १५ नोव्हेंबर २०१७ रोजी विनापरवाना बियाणांची विक्री करून केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतकºयांची फसवूणक केली़ प्रगत कृषी सेवा केंद्रातील संचालकांनी केवळ शेतकºयांचीच नव्हे तर शासनाचीही फसवणूक केल्याचे साठे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे़

Web Title: Cheating from sale of unprotected seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे