गोदावरी प्रवाहित होण्यासाठी  प्राचीन कुंडांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:35 AM2019-06-26T00:35:20+5:302019-06-26T00:35:36+5:30

सातत्याने कोरडीठक पडणारी गोदावरी प्रवाहित होण्यासाठी पात्रातील नैसर्गिक कुंड पुनर्जीवित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी मंगळवारी गोदा पात्रातील नैसर्गिक कुंडांची पाहणी केली.

 To check Godavari flow of ancient trunk | गोदावरी प्रवाहित होण्यासाठी  प्राचीन कुंडांची पाहणी

गोदावरी प्रवाहित होण्यासाठी  प्राचीन कुंडांची पाहणी

Next

पंचवटी : सातत्याने कोरडीठक पडणारी गोदावरी प्रवाहित होण्यासाठी पात्रातील नैसर्गिक कुंड पुनर्जीवित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी मंगळवारी गोदा पात्रातील नैसर्गिक कुंडांची पाहणी केली.
गोदावरी नदीपात्रात असलेले प्राचीन सतरा कुंड काँक्रिटीकरण मुक्त करून पुनर्जीवित करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनी अधिकाऱ्यांसमवेत गेल्यावेळी बैठकी झाली होती. बैठकीत ठरल्यानुसार याचिकाकर्ते देवांग जानी व नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांनी गोदावरी नदी परिसरात संयुक्त पाहणी दौरा केला. दौºयाची सुरुवात इंद्रकुड येथून करण्यात आली.
स्मार्ट सिटी अधिकारी वर्गाने इंद्रकुड ते रामकुंडापर्यंत अरुणा नदी पाइपलाइनद्वारे आणण्याचे प्रयोजन असल्याचे सांगितले. त्याला विरोध दर्शवित जानी यांनी विनंती केली की, इंद्राकुंडापासून ते रामकुंडापर्यंत अरुणा नदी नैसर्गिकरीत्या पुनर्जीवित करून रामकुंडातील अरुणा- गोदावरी संगम पूर्ववत करावा. यासाठी अरुणा नदीचे अस्तित्व दर्शविणारे सन १९१७ चा डीएलआर आणि सन १८८३चा ब्रिटिशकालीन नकाशा त्यांनी सादर केला. पुढे गोपिकाबाई यांच्या तास, लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड, रामकुंड, पाण्याखालचे अरुणा नदी गौमुख, गौतम ऋषींची प्राचीन मूर्ती, अस्थीवलय कुंड, सीताकुंड, अहिल्यादेवी कुंड, सारंगपाणी कुंड, सूर्य कुंड (पाच देऊळ कुंड), दुतोंड्या मारुती कुंड, अनामिक कुंड, दशाश्वमेघ कुंड, रामगया कुंड, पेशवे कुंड, खंडोबा कुंड, ओककुंड, वैशंपायन कुंड, मुक्तेश्वर कुंड अशा सतरा प्राचीन कुंडांची स्थान निश्चितीसह कुंडाचे माप, नकाशे, प्रत्येक कुंडांची महती त्याचे निर्माणकर्ता याची सरकार दप्तरी नोंद असलेली माहिती सादर केली.
नऊ ठिकाणी जिवंत जलस्रोत
गोदावरी नदीपात्रात नऊ ठिकाणी जिवंत जलस्रोत अस्तिवात असून काँक्रिटीकरण फोडून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे त्याची माहिती आणि फोटो दिले. नदीपात्रात बोअरवेल घेऊ नये अन्यथा निरीच्या आदेशाचे उल्लंघन होईल याची आठवण करून दिली. यावेळी याचिकाकर्ते देवांग जानी, स्मार्ट सिटीचे एस. पी. सिंग, विभांडिक, संजय पाटील, सुतार, ऋतूल जानी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Web Title:  To check Godavari flow of ancient trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.