अंबड परिसरात रसायनमिश्रित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:55+5:302021-06-02T04:12:55+5:30

प्रभाग २७ मधील अंबड परिसरातील दीपक दातीर मळा, सरपंच मळा, शिरसाठ मळा, रामकृष्ण दातीर मळा, मंदाताई दातीर मळे परिसरातील ...

Chemical water supply in Ambad area | अंबड परिसरात रसायनमिश्रित पाणीपुरवठा

अंबड परिसरात रसायनमिश्रित पाणीपुरवठा

Next

प्रभाग २७ मधील अंबड परिसरातील दीपक दातीर मळा, सरपंच मळा, शिरसाठ मळा, रामकृष्ण दातीर मळा, मंदाताई दातीर मळे परिसरातील नळाना गेल्या काही दिवसांपासून लाल रंगाचे रसायन (ऑईल) मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.

या परिसरालगत अंबड औद्योगिक वसाहत असून बहुसंख्य कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्याची योग्य व्यवस्था नसल्याने हे पाणी वॉल चेंबर तसेच क्षतिग्रस्त जलवाहिन्यांमधून थेट नागरिकांच्या घरातील नळांना येते. यासंदर्भात महानगरपालिकेच्या कार्यालयात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच अत्यल्प दाबाने व मध्यरात्री पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र त्यावर आजतागायत मनपाच्या अधिकारी व नगरसेवकांनी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. मध्यरात्रीनंतर उशिरा पाणी येत असल्याने अंधारात पाण्याचा रंग कळत नाही. दूषित पाणी वापरण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना पोट दुखणे, मळमळ होणे, असे आजार उद्भवल्याचा घटनाही घडल्या आहेत. या भागातील मनपा आधिकाऱ्याना वारंवार तक्रार करूनही नागरिकांना शुद्ध पिण्यायोग्य व मुबलक पाणी मिळत नाही.

परिसरातील नागरिकांनी आरोग्याला बाधा होऊ नये यासाठी पुढील काही दिवस शुद्ध पाणी येईपर्यंत पाणी वापरू नये, असे आवाहन शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांनी केले आहे.

Web Title: Chemical water supply in Ambad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.