निर्मला गावितांनी घेतले छगन भुजबळ यांचे आशीर्वाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:07 AM2019-10-04T01:07:54+5:302019-10-04T01:08:26+5:30

नाशिक : इगतपुरी - त्र्यंबक मतदारसंघातील शिवसेना उमेदवार निर्मलाताई गावित यांना राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ समोर दिसताच, त्या धावत गेल्या आणि त्यांनी भुजबळ यांना वाकून नमस्कार केला. गावित यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या हिरामण खोसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भुजबळ यांचे नक्की आशीर्वाद कोणाला अशी चर्चा सुरू झाली; परंतु उभयतांनी ज्येष्ठांना नमन करणे हा संस्काराचा भाग असतो, असे नमूद करून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न थांबवला.

Chhagan Bhujbal Blessed by Nirmala Gavit! | निर्मला गावितांनी घेतले छगन भुजबळ यांचे आशीर्वाद !

निर्मला गावितांनी घेतले छगन भुजबळ यांचे आशीर्वाद !

googlenewsNext
ठळक मुद्देचर्चा तर होणारच : दोघेही म्हणाले, हा संस्काराचा भाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : इगतपुरी - त्र्यंबक मतदारसंघातील शिवसेना उमेदवार निर्मलाताई गावित यांना राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ समोर दिसताच, त्या धावत गेल्या आणि त्यांनी भुजबळ यांना वाकून नमस्कार केला. गावित यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या हिरामण खोसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भुजबळ यांचे नक्की आशीर्वाद कोणाला अशी चर्चा सुरू झाली; परंतु उभयतांनी ज्येष्ठांना नमन करणे हा संस्काराचा भाग असतो, असे नमूद करून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न थांबवला.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी दुपारी हा प्रकार घडला. इगतपुरी - त्र्यंबक मतदारसंघातून सलग दोनवेळा कॉँग्रेसच्या आमदार राहिलेल्या निर्मला गावित यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला असून, त्या शिवसैनिकांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्याचवेळी याच मतदारसंघातील कॉँग्रेस उमेदवार हिरामण खोसकर हेदेखील आले होते. यावेळी छगन भुजबळ समोर दिसताच गावित यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. यासंदर्भात निर्मला गावित यांनी भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून, त्यामुळे त्यांना वंदन केल्याचे सांगितले. आपल्याकडे अशीच पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले, तर खोसकर यांच्याबरोबर आपण आलात आणि निर्मला गावित यांनी चरणस्पर्श केला. नक्की आशीर्वाद कोणाला देणार, असा प्रश्न करताच भुजबळ यांनी मी गावित यांच्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे. त्यामुळे ज्येष्ठत्वाच्या नात्यांनी त्यांनी मला नमस्कार केला आणि मी त्यांना आशीर्वाद दिला, याचा अर्थ मी काही त्यांचा प्रचार करेल असे होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Chhagan Bhujbal Blessed by Nirmala Gavit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.