छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:17 AM2019-09-01T01:17:16+5:302019-09-01T01:17:45+5:30

राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा होत असली तरी, भुजबळ यांच्या पक्षांतराबाबत राष्टवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र अनभिज्ञता दर्शविली आहे. गेल्या महिनाभरापासून भुजबळ यांनी पक्षाच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी अप्रत्यक्ष मौन पाळल्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना विचारणा करून खातरजमा करून घेत आहेत.

 Chhagan Bhujbal left for Mumbai immediately | छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Next

नाशिक : राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा होत असली तरी, भुजबळ यांच्या पक्षांतराबाबत राष्टवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र अनभिज्ञता दर्शविली आहे. गेल्या महिनाभरापासून भुजबळ यांनी पक्षाच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी अप्रत्यक्ष मौन पाळल्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना विचारणा करून खातरजमा करून घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नाशकात मुक्कामी असलेले भुजबळ शनिवारी (दि.३१) दुपारी तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याने या संदर्भातील चर्चांनी अधिक जोर धरला
आहे.
छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी महिनाभरापासून उलटसुलट चर्चा होत असून, भुजबळ यांनी त्याचे खंडण केले असले तरी, या संदर्भातील चर्चांना विराम मिळालेला नाही. खुद्द राष्ट्रवादीचे नेतेदेखील भुजबळ यांच्या सेना प्रवेशाविषयी साशंक असून, दोन दिवसांपूर्वी नाशिक दौºयावर येऊन गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील भुजबळ यांच्या प्रवेशाबाबत सावध पवित्रा घेतला होता. सुळे यांच्या दौºयातही भुजबळ कुठे दिसले नाहीत. त्यांची जागा माजी खासदार समीर भुजबळ यांनी भरून काढली. माध्यमांमध्ये सतत झोतात राहणारे भुजबळ हे दोन-तीन दिवसांपासून कुणाच्याही संपर्क कक्षेत येत नसल्याने त्यांच्या पक्षांतराच्या प्रवेशाच्या चर्चेला एकप्रकारे बळकटीच मिळत आहे.
जेव्हापासून भुजबळ यांच्या पक्षांतराची चर्चा झडू लागली तेव्हापासून त्यांनी पक्ष संघटनेपासून जवळपास फारकत घेतली असून, त्यामागे त्यांच्या प्रकृतीचे कारण सांगितले जात असले तरी, त्यांच्या नाशिकच्या दौºयाबाबत नेहमीच स्थानिक पदाधिकाºयांना यापूर्वी आगाऊ कल्पना देऊन त्यात सहभागी होण्याच्या सूचना केल्या जात होत्या. परंतु महिनाभरात भुजबळ अनेक वेळा नाशिक दौºयावर आले, त्यांनी येवला मतदारसंघातील कामांची पाहणीही केली. परंतु या दौºयात स्थानिक पदाधिकारी तसेच कट्टर भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºयांनादेखील दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे भुजबळांच्या मनात काय शिजते याचा थांगपत्ता नजिकच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांना अद्याप लागू शकला नाही. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना विचारणा करून आपापले अंदाज बांधू लागले आहेत.
अशातच शनिवारी दुपारपासून सोशल माध्यमांवर छगन भुजबळ यांच्या रविवार, दि. १ सप्टेंबर रोजी शिवसेना प्रवेशाचे वृत्त व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार वादळ उठले. त्यातच दोन दिवसांपासून नाशिक मुक्कामी असलेले भुजबळ दुपारी अचानक मुंबईकडे रवाना झाल्याने चर्चेने वेग घेतला.
भुजबळ फार्मवर शांतता
भुजबळ यांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चांना उधाण आलेले असताना भुजबळ फार्मवर मात्र शांतता दिसून आली. एरव्ही, भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा राबता असतो. परंतु भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चा झडत असताना फार्मवरील शांतताही वादळापूर्वीची मानली जात आहे.
समर्थक संभ्रमात
छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या जवळच्या विश्वासू सहकाºयांनाही जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याचे दिसून येते. त्यांनी समर्थकांना कुठल्याही प्रकारचा सुगावा लागू न दिल्याने समर्थकांमध्ये संभ्रमावस्था आहे. भुजबळ यांनी पक्षांतराचा निर्णय घेतलाच असेल तर त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पक्षप्रवेश हा साध्या पद्धतीने न होता त्यातून जोरदार शक्तिप्रदर्शनच व्हायला हवे, असे एका जवळच्या समर्थकाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु, भुजबळांनी याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू न दिल्याने उद्या पक्षप्रवेश झालाच तर तयारी कशा पद्धतीने करायची शिवाय, कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचे, हा प्रश्नही समर्थकांपुढे उभा ठाकला आहे.

Web Title:  Chhagan Bhujbal left for Mumbai immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.