छगन भुजबळ म्हणाले, 'राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण मी बोललो असतो तर धर्माचा रंग दिला असता'
By संजय पाठक | Published: October 2, 2023 12:10 PM2023-10-02T12:10:46+5:302023-10-02T12:11:20+5:30
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले आहे. मात्र, आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले.
- संजय पाठक
नाशिक- गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या लेझर शोमुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास झाल्याचे पुढे आले आहे त्याचबरोबर डॉल्बी डीजे मुळे कानालाही त्रास झाल्याचे स्पष्ट झाले आहे या विषयावर बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले आहे. मात्र, आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले.
आज सकाळी नाशिक मध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या डीजे आणि लेझर शो विषयी नाराजी व्यक्त केली पोलिसांनी जे नियम घालून दिले आहे त्याचे पालन होत नाही. मर्यादेपेक्षा अधिक डेसीबल डीजे वाजवला जातो. तसेच लेझर किरणांचा ही मोठ्या प्रमाणात वापर होतो नागरिकांना ते लक्षात येत नाही मात्र, मात्र त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. राज ठाकरे यांनी देखील अशा प्रकारच्या साधनांची मिरवणुकीत गरज आहे का याचा विचार करा असे म्हटले आहे तेच माझे मत आहे. अर्थात, मी अगोदर बोललो असतो तर त्याला वेगळा रंग दिला गेला असता असेही भुजबळ म्हणाले.