गुजरातच्या पाणी पळविण्याचा डाव हाणून पाडा उपाध्यक्ष प्रकाश वडजेंचे छगन भुजबळांना साकडे
By admin | Published: January 23, 2015 01:58 AM2015-01-23T01:58:05+5:302015-01-23T01:58:28+5:30
गुजरातच्या पाणी पळविण्याचा डाव हाणून पाडा
नाशिक : दमणगंगा-पिंजाळ व नार पार-तापी नर्मदा या प्रकल्पाचे हक्काचे पाणी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला मिळणार असताना ते पाणी गुजरातला पळविण्याचा डाव या प्रकल्पाच्या मंजुरीतून सुरू असून, तो राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अडविण्यासाठी प्रयत्न करावेत, यामागणीचे निवदेन जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांना दिले आहे. छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी म्हटले आहे की, उत्तर महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला मिळणारे पाणी गुजरात राज्याकडे वळविण्याबाबतची कार्यवाही केंद्र व राज्य शासनामार्फत सुरू आहे. त्यामुळे जिल्'ातील जनतेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. हे पाणी नाशिक जिल्'ासह उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी आहे. हे पाणी गुजरातकडे वळविल्यास निम्म्या महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे पळविले जाणार आहे. त्यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे.