छगन भुजबळ यांचा विजयी चौकार; येवलेकरांचे विकासावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:53 AM2019-10-25T00:53:44+5:302019-10-25T00:55:13+5:30

:Maharashtra Assembly Election 2019 येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा ५६ हजार ५२५ मतांनी पराभव केला.

 Chhagan Bhujbal won the toss; Yevalekar stamped on development | छगन भुजबळ यांचा विजयी चौकार; येवलेकरांचे विकासावर शिक्कामोर्तब

छगन भुजबळ यांचा विजयी चौकार; येवलेकरांचे विकासावर शिक्कामोर्तब

googlenewsNext

येवला : येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा ५६ हजार ५२५ मतांनी पराभव केला. भुजबळ यांना १ लाख २६ हजार २३७ मते मिळाली. येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांचा लागापाठ चौथा विजय असून, या विजयी चौकाराने मतदारसंघावर त्यांची पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. प्रशासनाच्या धीम्या गतीच्या कामामुळे व तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली.
गुरुवारी सकाळी पाटोदा रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बाभूळगाव येथील इमारतीत सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम टपाली मतांची मोजणी करण्यात येणार होती. मात्र टपाली मतदान जास्त असल्याने ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात करण्यात्ां आली. महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पहिल्याच फेरीत २५४२ मतांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या फेरीत त्यांची आघाडी निरंतर वाढत्ांंच गेली. पाचव्या फेरीत तब्बल ११ हजार ५६७ मतांची आघाडी झाली. त्यामुळे भुजबळ मोठ्या फरकाने विजयी होणार असल्याचे संकेत मिळाले. क्रमश: आघाडी वाढतच गेली. तशी भुजबळ यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करण्यास सुरुवात केली. ११व्या फेरीअखेर २० हजार २१२ मतांची आघाडी भुजबळ यांनी घेतली. या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार असल्याचा अंदाज मतदारांनी साफ खोटा ठरवला. २२व्या फेरीअखेर छगन भुजबळ यांना १ लाख २० हजार ८४४ हजार मते मिळाली, तर सेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना ६६ हजार ९६४ मते मिळाली होती. २३व्या अंतिम फेरीसह तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित ६ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची व्हीव्हीपॅटद्वारे मोजणी करून अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. छगन भुजबळ यांचा विजय निश्चित होताच, कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतमोजणीसाठी परिश्रम घेतले.
विजयाची तीन कारणे...
1मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्याद्वारे कातरणी व बाळापूरपर्यंत पोहोचले. हे पाणी डोंगरगावला नक्की येणार असा आशावाद जागवला गेला.
2भूमिपुत्राच्या मुद्द्याऐवजी जनता विकासाचा मुद्दा सर्वसामान्य जनतेला अधिक भावला.
3मुक्तिभूमीसह मागील १५ वर्षांत तालुक्यात झालेल्या विकासकामांची मतदारांनी दखल घेतली. आणि भुजबळांवर पुन्हा एकदा विश्वास दाखविला.
पवारांच्या पराभवाचे कारण...
विकासाच्या मुद्द्यापुढे भूमिपुत्राचा एकच मुद्दा कुचकामी ठरला. प्रचारातील विस्कळीतपणा, शिवाय निष्ठेने काम झाले नसल्याचे दिसून येते. आगामी पाच वर्षांत काय काम करणार याची दिशा मतदारांना फारशी स्पष्ट झाली नाही. सर्व विरोधक एकत्र आले असले तरी त्याचा मतांमध्ये अपेक्षित परिणाम जाणवला नाही.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
१ एकनाथ गायकवाड ब स.प. 635
२ संभाजी पवार शिवसेना 69712
३ सचिन अलगट वंचित ब. आ. 1858
४ सुभाष भागवत महाराष्ट्र क्र ांती सेना 654
५ महेंद्र पगारे अपक्ष 713
६ विजय सानप अपक्ष 287
७ संजय पवार अपक्ष 325

Web Title:  Chhagan Bhujbal won the toss; Yevalekar stamped on development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.