कृषी विधेयकांविरोधात छात्रभारती आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:00+5:302020-12-06T04:15:00+5:30
नाशिक : केंद्र सरकारने आणलेली कृषी उत्पादन व विपणनविषयक विधेयके शेतकरीविरोधी असून, या विधेयकांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेले शेतकरी ...
नाशिक : केंद्र सरकारने आणलेली कृषी उत्पादन व विपणनविषयक विधेयके शेतकरीविरोधी असून, या विधेयकांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन केंद्र सरकार बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप छात्रभारती विद्याथर्प संघटनेने केला आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात आक्रमक भूमिका घेत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शनिवारी (दि.५) नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यायासमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले.
दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून तसेच अश्रुधूर सोडून महामार्गावर खड्डे खणून शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला आहे. दिल्लीतील आंदोलनात दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले असून, केंद्र शासनाच्या या कृत्याचा छात्रभारती आणि राष्ट्र सेवा दल महाराष्ट्रभर तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव नितीन मते, छात्रभारतीचे माजी अध्यक्ष ॲड. शरद कोकाटे, राज्य संघटक समाधान बागुल, सदाशिव गणगे, आम्रपाली वाकळे, वनिता जावळे, स्वाती त्रिभुवन, देवीदास हजारे, युसूफ सय्यद, गायत्री काळे, श्रेया मोरे, आशिष कळमकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो- ०५पीएचडीसी६५) केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात निदर्शने करताना छात्रभारतील राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.