छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे होणार सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:57+5:302021-06-25T04:11:57+5:30

सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला ...

Chhatrapati Shivaji Maharaj Chowk will be beautified | छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे होणार सुशोभीकरण

छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे होणार सुशोभीकरण

Next

सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सांस्कृतिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या वडांगळी व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सोमठाणे गावापासून जवळपास सारख्याच अंतरावर देव नदीच्या तीरावर वसलेले मेंढी गाव हे वसलेले आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील सर्व घडामोडींचे प्रतिबिंब येथे उमटते. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकात भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिराजवळच शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वी बसवण्यात आलेला आहे. हा संपूर्ण परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ग्रामविकास विभागाच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत २० लाख रुपये निधी मंत्रालय स्तरावरून मंजूर करून आणला आहे.

यावेळी सरपंच गिते यांच्यासह उपसरपंच प्रवीण गिते, ग्रामपंचायत सदस्य योगेश गिते, विजय गिते, पूजा गिते, सुरेखा गिते, अलका गवळी, ग्रामसेवक राजेंद्र आघाव, अनिल गिते, सुरेशचंद्र गिते, सतीश गिते, बंडू गिते, सुभाष गवळी, सोमनाथ गिते, किशोर गिते, रामदास गिते आदींसह शिवाज्ञा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

--------------

शिवार रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

गावात व्यापारी संकुल उभारणे, पाणीपुरवठा विहिरीवर सौर मोटरपंप बसविणे, कामे शिल्लक असलेल्या शिवार रस्त्यांची दुरुस्ती करणे व हनुमान मंदिरासमोर डोम बसविणे आदी कामासाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आमदार कोकाटे यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Chowk will be beautified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.