छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्वधर्म समभाव होता : कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 02:11 PM2020-01-19T14:11:55+5:302020-01-19T14:16:10+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर व आपल्या सैन्यावर आई-वडीलांसारखे प्रेम केले. तसेच यामुळे जनतेनेही त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले.

Chhatrapati Shivaji Maharaj had the same religion: Kasbe | छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्वधर्म समभाव होता : कसबे

छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्वधर्म समभाव होता : कसबे

googlenewsNext
ठळक मुद्देमुस्लिमांच्या भावना कधीही दुखावल्या नाहीसैन्यात अनेक मुस्लिम मावळेही होतेआदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवण्याची गरज

नाशिक :छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर व आपल्या सैन्यावर आई-वडीलांसारखे प्रेम केले. तसेच यामुळे जनतेनेही त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले. त्या काळात भारतावर असलेले मुस्लिमांच्या राज्याला उतरती कळा लावणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते. मात्र त्यांनी मुस्लिमांच्या भावना कधीही दुखावल्या नाही. असे राजकीय विश्लेषक व विचारवंत रावसाहेब कसबे यांनी सांगितले.
    अ‍ॅड. दौलतराव घुमरे लिखित ‘प्रज्ञावान भुमिपुत्र शिवाजी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि.१९) रावसाहेब थोरात सभागृह येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी त्यांनी असे सांगितले की, शिवाजी महाराज हे सर्व धर्मांना समानता देणारे व सर्वांचा सन्मान करणारे राजे होते. त्यांनी त्यावेळी राजकारण व धर्मकारण यांची एकप्रकारे फारकतच केली होती. त्यांच्या काळात त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम मावळेही होते. छत्रपतींचे आरमारही एका मुस्लिम व्यक्तिने उभारले होते. त्यामूळे शिवाजी महाराज व मुस्लिमांमध्ये एक जवळचे नाते होते. मात्र आज देशात जाती पातीमुळे देश मागे येत आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचे कसबे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, महाराष्टÑ व गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बी. जी. पाटील, माजी न्यायाधिश एम. जी. गायकवाड, बार कॉन्सिलचे संचालक अविनाश भिडे, रोजा देशपांडे, स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj had the same religion: Kasbe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.