छत्रपती शिवरायांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:40 PM2020-02-19T23:40:36+5:302020-02-20T00:11:15+5:30
जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात सोहळ्याचा उत्साह दिसून आला. भगवे ध्वज, भगवे फेटे, मोटारसायकल रॅली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या.
नाशिक : जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात सोहळ्याचा उत्साह दिसून आला. भगवे ध्वज, भगवे फेटे, मोटारसायकल रॅली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या.
सिन्नर येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याभोवतालचा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा पूजन करण्यात आले. नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, विजय जाधव, बाळासाहेब उगले आदींसह नागरिक उपस्थित होते. नगर परिषदेने नुकतेच २२ लाख रुपये खर्चातून सुशोभिकरण केले. नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष किरण डगळे व मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवकांसह दीपक भाटजिरे, भीमराव संसारे, सुनील शिंदे, खेलूकर, नीलेश चव्हाण, भानुदास घोरपडे, संजय मुरकुटे, नीलेश भुसे, राजेंद्र आंबेकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष डगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर माहिती दिली. सिन्नर सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यवाह हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य, संचालक चंद्रशेखर कोरडे, मनीष गुजराथी, संजय बर्वे, सागर गुजर, जितेंद्र जगताप, नगराध्यक्ष डगळे, अॅड. श्रीकांत गुजराथी, सुजाता तेलंग, ज्योती वामने, शैलेश नाईक, मु. शं. गोळेसर, राजेश खरजुले, अंबादास भालेराव, सचिन पांगारकर, विकास उकाडे आदी उपस्थित होते.