किकवारीत बिबट्याने केले वासरु फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 05:37 PM2018-09-25T17:37:28+5:302018-09-25T17:39:16+5:30
बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील शेतकरी रघुनाथ जिभाऊ खैरनार यांच्या मालकीचे सहा महिन्याचे वासरूवर बिबट्याने हल्ला करून फस्त केले.
सकाळी गाईचे दुध काढण्यासाठी खैरनार हे त्यांच्या वाड्यात गेले तेव्हा वासरुचा काही भाग हा वाड्यातच पडल्याचे निदर्शनास आले. खैरनार यांनी डांगसौदाणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, वन कर्मचाºयांनी पंचनामा केला.
जोरण, किकवारी, विंचुरे, कपालेश्वर, दहिदुले, निकवेल परिसरात ब-याच दिवसापासून तळ ठोकून बसलेल्या बिबट्याने अनेक जनावरे फस्त केली आहेत. किकवारी बुद्रुक येथील सुरेश काळु बागुल या शेतकºयाच्या दोन वर्षाच्या वासराला आठ दिवसापूर्वी फस्त केले होते. परिसरात बिबट्याचा सतत सुरु असलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. चार ते पाच महिन्यांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तसेच परिसरातील शेतात मका, बाजरी आदि पीके मोठी असल्याने बिबट्या लपण्यासाठी या शेतांचा आधार घेत आहे. त्यामुळे शेतकºयांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरण्यासाठी जाता येत नसून बिबट्याचे या परिसरात वास्तव्य असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.