मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची औंदाणेस भेट, ग्रामसेवकास धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:13 PM2018-08-27T15:13:40+5:302018-08-27T15:14:02+5:30
औदाणे : बागलाण तालुक्यातील यशवंतनगर (औदाणे) येथील राष्टीय पेयजल योजनेतंर्गत बाधंण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व स्वच्छ सर्वेक्षणबाबत ग्रामपंचायत सदस्य शार्मिला गोसावी व ग्रामस्थांना अॅपने माहिती न दिल्याबदल ग्रामसेवकास धारेवर धरले. औदाणे ग्रामपंचायत अंतर्गत पेयजेल योजना अंतर्गत हया गांवाला स्वतंत्र हती नदीत विहीर खोदून,गांवात पाण्याची टाकीअशी सुमारे ३१ लाख १५ हजाराची ही नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा पाणीपुरवठा ग्रामस्थाना सुरळीत होतो की नाही याबाबत मुख्यकार्यकारी आधिकारी डॉ. गिते यांनी पाण्याची टाकीवर चढुन व हती नदीत जावून विहीरीची पाहणी केली व पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामस्थांशी विचारपुस केली, यावेळी जि.प.चे पाणीपुरवठा मुख्य अभियंता ठाकुर, उपअभियंता मोराणकर, गटविकास अधिकारी महेश पाटील, शाखा अभियंता अशोक शिदे, सरपंच सविता निकम, ग्रामपंचायत सदस्य शिर्मला गोसावी, रविंद्र गोसावी, ग्रामसेवक योगेश सुर्यवंशी आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------------
गांवातील नळ पाणीपुरवठा योजनेची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी पाहणी केली मात्र. शासन राबवित असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणच्या अॅपची माहिती भरणे व जनजागृती करणे बाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना माहिती देणे ग्रामसेवकानी देणे गरजेचे होते.
-शर्मिला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य, औंदाणे