जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:38 AM2018-02-07T01:38:00+5:302018-02-07T01:38:47+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले नरेश गिते यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारली. दीपककुमार मीणा यांनी गिते यांच्याकडे सूत्रे सुपुर्द केली.
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले नरेश गिते यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारली. दीपककुमार मीणा यांनी गिते यांच्याकडे सूत्रे सुपुर्द केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी गिते यांचे स्वागत केले.
जिल्हा परिषदेचे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा सोमवारी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी मीराभार्इंदर महापालिकेचे आयुक्त नरेश गिते यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. गिते यांनी मंगळवारी सायंकाळी मीणा यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेत आपण चांगले काम करून दाखवू, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्णातील कुपोषणावर प्रभावी कामकाज करण्याचा मनोदय व्यक्त केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना कुपोषणग्रस्त भागात आपण नाशिक जिल्ह्णातील आदिवासी भागातील कुपोषणग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे. तेथील प्रश्नांची आपणाला माहिती असल्याने त्याचा उपयोग कुपोषणावर काम करताना नक्कीच होईल, असेही ते म्हणाले. गिते यांनी यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांचीही भेट घेतली. यावेळी सांगळे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, रत्नाकर पवार, गोरख बोडके आदी उपस्थित होते.मीरा भार्इंदरचे आयुक्त असलेले गिते यांनी यापूर्वी गटविकास अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कामकाज केलेले असल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या कामांचा चांगला अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर आपण नाशिक जिल्हा परिषदेच चांगले काम करून दाखवू, असा विश्वास त्यांनी केला. जिल्हा परिषदेत कर्मचाºयांची अपुरी संख्या तसेच विकासकामे आणि निधीची सांगड घालून विश्वासाने काम करावे लागणार आहे. अधिकारी, कर्मचाºयांना बरोबर घेऊन कामकाज केले जाईल, असे गिते यावेळी म्हणाले.