मुख्यमंत्री कोण...देवेंद्र फडण दोन शुन्य..!
By संजय पाठक | Published: June 19, 2019 02:57 PM2019-06-19T14:57:40+5:302019-06-19T15:00:26+5:30
नाशिक- महाराष्टÑाचे मुख्यमंत्री कोण? फडण दोन शुन्य....मी तुझ्या सारखे पाच सहा पाहिलेत...म्हणजेच छपन्न बघितलेत.... दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील क्रांतीकारी बदलावरून सोशल मिडीयावर खिल्ली उडवली जात असून नेटकऱ्यांनी हा विषय गांभिर्याने न घेता हास्यास्पद असल्याची टीका देखील केली आहे.
नाशिक- महाराष्टÑाचे मुख्यमंत्री कोण? फडण दोन शुन्य....मी तुझ्या सारखे पाच सहा पाहिलेत...म्हणजेच छपन्न बघितलेत.... दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील क्रांतीकारी बदलावरून सोशल मिडीयावर खिल्ली उडवली जात असून नेटकऱ्यांनी हा विषय गांभिर्याने न घेता हास्यास्पद असल्याची टीका देखील केली आहे.
शालेय शिक्षणक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित होय. गणिताची ही भीती घालविण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाय यापूर्वी केले गेले आहेत. मात्र बालभारतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणित संख्या वाचनासाठी केलेला प्रयोग मात्र टीकेला कारण ठरला आहे. बत्तीस न म्हणता तीस आणि दोन, एकसष्ट ऐवजी साठ आणि एक, एकाहत्तर ऐवजी सत्तर आणि एक अशाप्रकारे उच्चार करण्याचे धडे देण्यात येणार आहे. शिक्षणतज्ज्ञांमध्ये याविषयी दोन प्रवाह असले तरी बहुतांशी तज्ज्ञ आणि नागरीकांना हा विषय पटलेला नाही. अनेक पिढ्यांपासून अशाच प्रकारे गणित शिकवले जात असताना आता असे सुलभ संख्या वाचन करण्याच्या नावाखाली गोंधळ घातला जात असून त्यामुळे मुलांची संभ्रमावस्था अधिक वाढणार आहे. अर्थात, हा तज्ज्ञांच्या गांभिर्याचा विषय असला तरी सोशल मिडियावर बाल भारतीच्या या निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे.
शिक्षिका - महाराष्टÑाचे मुख्यमंत्री कोण?
बंटी- देवेंद्र फडण दोन शून्य
त्याच प्रमाणे
शिक्षिका- पाणी कोणी चोरलं?
बंटी- एक दोन मतीच्या साहेबांनी...
अशी बारामतीची खिल्ली उडविण्यात आली आहे.
सामन्या बोलताना काय गोंधळ उडेल याबाबत देखील किस्सा व्हायरल होत आहे.
ती (चिडून) - अरे जा...तु काय समजतोस स्वत:ला? मी तुझ्या सारखे पाच सहा बघितले...
तो (आश्चर्याने)- पाच- सहा?
त्याचा मित्र- अरे तीला छपन्न म्हणायचंय...ती नवीन सिलॅबसवाली आहे.
अशाप्रकारच्या खिल्ली उडविण्यात येत आहे. शासनाच्या बालभारतीचा विषय रूचत टीकास्पद ठरला आहे.