संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या भूमिपूजनासाठी नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतक-यांचे काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:40 PM2017-12-26T15:40:41+5:302017-12-26T18:30:04+5:30

समांतर रस्त्याच्या बाजूने संरक्षक जाळ्यांच्या ठिकाणी बघ्यांच्या स्वरुपात येऊन उभे राहिले. फडणवीस यांचा ताफ्यामधील पोलीस वाहनांचा सायरन ऐकू येताच शेतकरी सावध झाले आणि वाहने जवळ आल्यानंतर दहा ते बारा शेतक-यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले.

Chief Minister Devendra Fadnavis, who went to Trimbakeshwar via Nashik for the repair of Sant Nivruttinath Maharaj Samadhi temple, black flag of farmers | संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या भूमिपूजनासाठी नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतक-यांचे काळे झेंडे

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या भूमिपूजनासाठी नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतक-यांचे काळे झेंडे

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी शेतक-यांना ताब्यात घेतल्याची माहिती कोणार्कनगर परिसरात चौफूलीवर शेतक-यांनी काळे झेंडे फडकावून निषेध

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर दौ-यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला मंगळवारी (दि.२६) मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगर येथे शेतक-यांनी काळे झेंडे दाखविले. शेतक-यांना ‘दलाल’ संबोधल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखविले.
ओझर विमानतळावर फडणवीस यांचे दुपारी आगमन झाले. मोटारीने त्यांचा ताफा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने नाशिकमार्गे निघाला असता महामार्गावर कोणार्कनगर परिसरात चौफूलीवर शेतक-यांनी काळे झेंडे फडकावून निषेध व्यक्त केला. समृध्दीबाधित शेतक-यांचा एक गट येथील एका हॉटेलमध्ये चहापानासाठी जमला व त्यानंतर अचानाकपणे चौफुलीवरील जोड रस्त्यांची वाहतूक ताफ्याला मार्गस्थ होण्यासाठी पोलिसांकडून थांबविली गेली. शेतकरी सतर्क होत हॉटेलमधून एक-एक करुन बाहेर पडले आणि चौफूलीवरील समांतर रस्त्याच्या बाजूने संरक्षक जाळ्यांच्या ठिकाणी बघ्यांच्या स्वरुपात येऊन उभे राहिले. फडणवीस यांचा ताफ्यामधील पोलीस वाहनांचा सायरन ऐकू येताच शेतकरी सावध झाले आणि वाहने जवळ आल्यानंतर दहा ते बारा शेतक-यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. सदर बाब बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संबंधित शेतक-यांना ताब्यात घेत आडगाव पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती मिळाली.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis, who went to Trimbakeshwar via Nashik for the repair of Sant Nivruttinath Maharaj Samadhi temple, black flag of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.