जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By admin | Published: May 19, 2017 12:17 AM2017-05-19T00:17:38+5:302017-05-19T00:18:06+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी आत्महत्या, कर्जमुक्ती, समृद्धी महामार्ग, तूर खरेदी यांसारख्या राज्याला भेडसाविणाऱ्या साऱ्या प्रश्नांना भारतीय जनता पक्ष व पर्यायाने या पक्षाचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा एकतर्फी निष्कर्ष काढून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात यापूर्वीच उभ्या केलेल्या शिवसेनेने शुक्रवारच्या कृषी अधिवेशनात सरकार विरुद्ध आणखी मोठी घोषणा केली जाण्याची व्यक्त केलेल्या शक्यतेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत यांनी
प्रसिद्धीमाध्यमांना अधिवेशनाची माहिती देताना भारतीय जनता पक्ष व राज्य सरकारवर प्रत्येक प्रश्नावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना नोटाबंदीदेखील कारणीभूत असल्याचे सांगून अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील टीकेचे लक्ष्य केले. तूर खरेदीच्या प्रश्नावर सरकार गोंधळेले असल्याचे तर समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा स्वप्नवत प्रकल्प असल्याने त्यात शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसल्याचे सांगून शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभी राहील, अशी भूमिकाही या नेत्यांनी जाहीर करून टाकली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनावर लॉँगमार्च काढण्याचा इशाराही देऊन टाकण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना जे काही आगामी काळात करणार त्या त्या आंदोलनाची तसेच राज्यापुढील प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून भाजपावर विरोधी पक्षांनी करावी तशी टीका केलेली आहे.
शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यापासूनच भाजपावर नाराज असल्याचे आजवर लपून राहिलेले नाही. मध्यंतरीच्या काळात टोकाची भूमिका घेऊन सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे खिशात ठेवल्याचेही जाहीर करण्यात आले होते. कालापव्ययात या राजीनाम्याचे काय झाले हे कळू शकले नसले तरी, सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे त्यांच्या राज्यव्यापी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून दिसू लागले आहे. त्यामुळे कृषी अधिवेशनाची माहिती देताना सेना नेत्यांनी ज्या पद्धतीने साऱ्या गोष्टींना भाजपाच जबाबदार असल्याचे ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला ते पाहता उद्धव ठाकरे त्याहीपेक्षा पुढे जाऊन काही तरी मोठी घोषणा करतील याविषयी साशंकता नसली तरी, ती घोषणा काय असेल याविषयीची उत्सुकता लागून आहे. शिवसेनेने ताणली उत्सुकता
काही तरी महत्त्वाची भूमिका शिवसेना या अधिवेशनात घेणार असून, त्याची मोठी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करणार असल्याचे सांगून सेना नेत्यांनी साऱ्यांचीच उत्सुकता ताणून धरली आहे.