मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:04 AM2017-12-26T01:04:01+5:302017-12-26T01:04:26+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील दौºयावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.
नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील दौºयावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे. गुजरातच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ आटोपून फडणवीस दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी हेलिकॉप्टरने ओझर विमानतळावर येतील व तेथून मोटारीने त्र्यंबकेश्वरकडे रवाना होतील. संत श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन तसेच नवीन भक्तनिवासाचे उद्घाटन दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर चार वाजून १० मिनिटांनी मोटारीने डोंगरे वसतिगृहात भरलेल्या शेल्टर प्रदर्शनास भेट देतील. या ठिकाणी फडणवीस एक तास थांबतील. त्यानंतर मोटारीने ओझर विमानतळाकडे रवाना होतील. पाच वाजून ५० मिनिटांनी हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे रवाना होतील. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौºयाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्र्यंबक नगरपालिकेत सत्तांतर होऊन भाजपाच्या हाती सत्ता मिळाल्याने यावेळी नगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.