जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी केदा अहेर बिनविरोध : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:09 AM2017-12-24T00:09:25+5:302017-12-24T00:13:42+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक अखेर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली असून, केदा अहेर यांची एकमताने अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहेर यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शविल्याने अन्य इच्छुकांची नावे मागे पडून केदा अहेर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक अखेर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली असून, केदा अहेर यांची एकमताने अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहेर यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शविल्याने अन्य इच्छुकांची नावे मागे पडून केदा अहेर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कºहे यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केदा अहेर यांचे दोन अर्ज दाखल करण्यात आले. त्यातील एका अर्जावर सूचक म्हणून संदीप गुळवे, अनुमोदक माणिकराव कोकाटे तर दुसºया अर्जावर सूचक म्हणून परवेज कोकणी व अनुमोदक गणपतराव पाटील हे होते. साडेअकरा वाजेनंतर अर्जाची छाननी करण्यात आली. एकच अर्ज असल्याने माघारीचा प्रश्नच नसल्याने निवडणूक अधिकाºयांनी केदा अहेर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. तत्पूर्वी सकाळपासून अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांची घालमेल वाढली होती. माणिकराव कोकाटे, परवेज कोकणी व केदा अहेर या तिघांमध्येच रस्सीखेच असल्याने पालकमंत्री कोणाचे नाव जाहीर करतात याकडे साºयांचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या काही वेळ अगोदरच पालकमंत्र्यांचा सांगावा आल्याने अन्य इच्छुकांनी आपली दावेदारी मागे घेत उलट केदा अहेर यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक होत समर्थन दर्शविले. अहेर यांच्या नावाची घोषणा होताच बाहेर जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी ढोल-ताशावर ठेका धरला.
केदा अहेर यांची एकमताने निवड होताच उपस्थित संचालकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. यावेळी जवळपास सर्वच संचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिरीष कोतवाल यांनी बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीची ऊहापोह करताना बॅँकेने आगामी काळात वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज विषद केली. यंदा द्राक्षाचा हंगाम चांगला असून, किंमतही चांगली असल्याने द्राक्ष उत्पादकांना पैसे मिळाल्यास बॅँकेच्या वसुलीस मदत होण्याची शक्यता व्यक्त केली. आमदार जे. पी. गावित यांनी, बॅँकेची हलाखीची परिस्थिती व शेतकºयांचा होणारा भ्रमनिरास पाहता, संचालकपदाचा राजीनामा द्यावा काय, अशी भावना मनात वारंवार निर्माण होत होती. परंतु शेतकºयांना वाºयावर सोडून चालणार नसल्याने आता नवीन अध्यक्षांनी शेतकºयांच्या हिताचा कारभार करावा असा सल्ला दिला. आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी जिल्हा बॅँक वाचविण्याची भूमिका घेतल्यामुळे अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे सांगितले. आमदार अनिल कदम यांनी, शेतकरी अडचणीतून मार्गक्रमण करीत असल्यामुळे पक्षभेद बाजूला ठेवून बॅँकेची परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची गरज बोलून दाखविली. माणिकराव कोकाटे यांनी, अध्यक्षपद हे काटेरी मुकुट असून, सर्वांनी प्रयत्न व शासनाच्या मदतीशिवाय हे शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सुहास कांदे, गणपतराव पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, परवेज कोकणी, दिलीप बनकर, शिवाजी चुंभळे, डॉ. शोभा बच्छाव, सचिन सावंत, धनंजय पवार, किशोर दराडे, नामदेव हलकंदर, संदीप गुळवे आदी उपस्थित होते. आभार नरेंद्र दराडे यांनी मानले.
सध्या बॅँकेची एकूणच आर्थिक परिस्थिती पाहता, बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वच संचालकांच्या सहकार्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार, मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्ह्णातील खासदार, आमदारांची मदत आवश्यक आहे. आपल्या कारकिर्दीत सर्वांना बरोबर घेऊन कामकाज करून येणाºया अडचणीतून निश्चितच मार्ग काढण्यात येईल. यासाठी ज्येष्ठ संचालकांच्या सल्ल्याने वेळोवेळी निर्णय घेण्यात येतील.
- केदा अहेर, नवनियुक्त अध्यक्ष सध्या बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहता, बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार, मुख्यमंत्री, पालकमंत्री व खासदार, आमदारांची मदत आवश्यक आहे. सर्वांना बरोबर घेऊन कामकाज करून येणाºया अडचणीतून मार्ग काढण्यात येईल. ज्येष्ठ संचालकांच्या सल्ल्याने निर्णय घेण्यात येतील.
- केदा अहेर, अध्यक्ष