मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे पाप मुख्यमंत्र्यांनी झाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:25 PM2019-01-16T18:25:25+5:302019-01-16T18:26:13+5:30

धनंजय मुंडे : जयंत पाटील, छगन भुजबळ यांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

The Chief Minister of Gujarat has shown the corruption of the ministers | मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे पाप मुख्यमंत्र्यांनी झाकले

मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे पाप मुख्यमंत्र्यांनी झाकले

Next
ठळक मुद्देउध्दव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडावी असा सल्ला पाटील यांनी दिला.

नाशिक : पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे स्वप्न दाखविणाºया भाजपा सरकारचे मंत्री भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. विधानपरिषदेत आपण १६ मंत्र्यांच्या ९० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना क्लिन चिट देत त्यांची पापे झाकली असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे राष्टÑवादी कॉँग्रेसची ‘निर्धार परिवर्तना’चा यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते. राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या झालेल्या सभेस व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ, आमदार जितेेंद्र आव्हाड, माजी मंत्री फौजिया खान, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, हेमंत टकले, जयवंत जाधव, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुंडेपुरावे खोटे असेल तर कोणत्याही चौकात आपल्याला फाशी द्या, नाहीतर या मंत्र्यांची चौकशी करा अशी मागणी आपण विधानपरिषदेत केल्याचे धनजंय मुंडे यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.  केंद्र आणि राज्यातील सरकार सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोप राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड आणि भेद यांचा कानमंत्र दिला असल्याचे ते म्हणाले. सध्याचा भाजपा हा पक्ष वाजपेयी आणि अडवाणी यांचा राहिला नसून तो अमित शहा यांचा झाल्याचेही ते म्हणाले. उध्दव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडावी असा सल्ला पाटील यांनी दिला.
भांडणे लावून देण्याची कामे - भुजबळ
सध्याचे सरकार मराठा आणि ओबीसी, सुवर्ण आणि दलीत व हिंदू आणि मुस्लीम यांच्यात वाद लावून देण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार छगन भुजबळ यांनी केला. गर्वाचे घर खाली करण्याची वेळ आली असून परिवर्तन घडवावेच लागेल असे भुजबळ म्हणाले.

 

Web Title: The Chief Minister of Gujarat has shown the corruption of the ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.