आवास योजनेच्या लाभार्थींशी मुख्यमंत्री साधणार संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:40 AM2019-01-02T00:40:32+5:302019-01-02T00:41:31+5:30
नाशिक : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत.
नाशिक : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत.
राज्य व केंद्र सरकाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व त्यातील समस्यांविषयी माहिती घेण्यासाठी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून, नाशिक जिल्ह्णातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री बुधवारी (दि.२) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांसह पंतप्रधान आवास योजना (नागरी व ग्रामीण) लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार आहेत. यात आवास पंतप्रधान आवास ग्रामीण योजनेच्या १५ व शहरी योजनेच्या १५ लाभार्थ्यांसह रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार आहेत.
त्याचप्रमाणे म्हाडाच्या घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांचाही यात समावेश असणार आहे.