कळवण व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:47+5:302021-04-09T04:15:47+5:30
निवेदनात नमूद केले आहे की, आतापर्यंत सरकारच्या प्रत्येक निर्णयात व्यापारी वर्गाने संपूर्ण सहकार्य केले आहे. आठवड्यातील शनिवार व रविवार ...
निवेदनात नमूद केले आहे की, आतापर्यंत सरकारच्या प्रत्येक निर्णयात व्यापारी वर्गाने संपूर्ण सहकार्य केले आहे. आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस बंद ठेवून व नियमांचे पालन करीत व्यापारी सरकारला सहकार्य करीत आहेत. मात्र ३० एप्रिलपर्यंत व्यापार बंद ठेवणे हे अशक्य आहे . तसे केल्यास व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. त्याचा परिणाम व्यापारावरही होईल. शासनास मिळणाऱ्या विविध स्वरूपांच्या करांवरही होईल. व्यापाऱ्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सकारात्मक विचार करीत सर्व व्यापार सुरू करण्याचा निर्णय घ्यावा व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही कळवण व्यापारी महासंघाने निवेदनात केले आहे.
निवेदनावर कळवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, उपाध्यक्ष जयवंत देवघरे, सरचिटणीस विलास शिरोरे, खजिनदार कुमार रायते, संचालक रंगनाथ देवघरे, चंद्रकांत कोठावदे, विजय बधान, देविदास विसपुते, प्रकाश संचेती, श्रीकांत मालपुरे, प्रकाश पाटील, दीपक महाजन, राजेंद्र अमृतकार, नितीन वालखडे, कैलास पगार, लक्ष्मण खैरनार, नीलेश दुसाने, हेमंत कोठावदे, उमेश सोनवणे, संदीप पगार, सागर खैरनार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.