मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन
By admin | Published: January 3, 2016 12:01 AM2016-01-03T00:01:50+5:302016-01-03T00:02:44+5:30
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन
त्र्यंबकेश्वर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कुटुंबीयांसह शनिवारी त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत पत्नी मीनल, मुलगा कुणाल, कार्तिक आदि उपस्थित होते.
शिवराजसिंह चौहान यांनी महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्याकरिता अनेकवेळा भेटी दिल्या आहेत. उज्जैन येथील कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येऊन प्रत्येक आखाड्यातील साधू-महंतांना त्यांनी निमंत्रण दिले
होते.
दुपारी त्यांचे त्र्यंबकेश्वरला आगमन झाल्यानंतर ते सोवळे परिधान करून गर्भगृहात गेले. तेथे दर्शन, धार्मिक पूजाविधी झाल्यानंतर मंदिरात लघू रुद्रअभिषेक, पूजा, आरती पार पडली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, माजी नगराध्यक्ष यशोदा अडसरे, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, विश्वस्त कैलास घुले, अॅड. श्रीकांत गायधनी आदि उपस्थित होते.
यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे शाल, श्रीफळ, त्र्यंबकेश्वराची प्रतिमा व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकुले, हवालदार दिवटे, दिलीप वाजे आदिंनी बंदोबस्त ठेवला होता. भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री पंचायती बडा आखाड्यात प्रयाण केले. त्याठिकाणी भोजन केले. (वार्ताहर)