मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाशकात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:47 AM2020-02-16T01:47:25+5:302020-02-16T01:47:49+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाशकात आगमन झाले असून, रविवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब यांचेही शहरात आगमन झाले आहे.
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाशकात आगमन झाले असून, रविवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब यांचेही शहरात आगमन झाले आहे.
नाशिक येथे महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलच्या वतीने राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्ताने नाशिक जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ओझर विमानतळावर आगमन झाले. तेथून शासकीय विश्रामगृहावर ते रात्री मुक्कामी होते. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री ठाकरे जिल्हा न्यायालयातील कार्यक्रमाला हजेरी लावतील व दुपारी बारा वाजता ओझरहून मुंबईकडे प्रयाण करतील.