मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:04+5:302021-01-23T04:15:04+5:30
बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. अनिल देसाई, खा. विनायक राऊत, युवासेनेचे वरुण सरदेसाई आदी उपस्थित होते. ...
बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. अनिल देसाई, खा. विनायक राऊत, युवासेनेचे वरुण सरदेसाई आदी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील अडीअडचणी व विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावेळी साकडे घातले. याबाबत दखल घेत त्यांनी तातडीने समन्वय समिती स्थापन करून कार्यवाहीचे निर्देश दिले. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी पक्षसंघटनेची बांधणी करून काटेकोर नियोजन करण्याची सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना केली.
निफाडचे माजी आमदार अनिल कदम, सिन्नरचे राजाभाऊ वाजे, देवळालीचे योगेश घोलप, इगतपुरीच्या निर्मला गावित, नाशिकचे सुनील बागुल, वसंत गिते, येवल्याचे संभाजी पवार, दिंडोरीचे भास्कर गावित, सुरगाण्याचे मोहन गांगुर्डे आदींनी आपापल्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने कोणत्याच मतदारसंघात विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
फोटो - २२ सीएम मीटिंग
वर्षा येथील शासकीय निवासस्थानी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, समवेत आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकारी.
===Photopath===
220121\22nsk_20_22012021_13.jpg
===Caption===
फोटो - २२ सीएम मीटिंगवर्षा येथील शासकीय निवासस्थानी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंशी चर्चा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, समवेत आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकारी.