पूरग्रस्तांच्या मदतीचा प्रश्न प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Published: August 20, 2016 12:56 AM2016-08-20T00:56:24+5:302016-08-20T00:56:49+5:30

मुख्य सचिवांकडून माहिती : गरज आठ कोटींची

In the Chief Minister's court, | पूरग्रस्तांच्या मदतीचा प्रश्न प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

पूरग्रस्तांच्या मदतीचा प्रश्न प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Next

नाशिक : सलग चोवीस तासापेक्षा अधिक काळ तुफान कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात दाखल झाला असून, शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवांना पुरामुळे झालेली हानी व त्यांना मदत देण्याबाबतची माहिती सादर करण्यात आली.
मंगळवार, दि. २ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व नद्या, नाल्यांना पूर येऊन मोठ्या प्रमाणावर हानी झाली, त्याचबरोबर चोवीस तासाहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने हजारो घरांची पडझड झाली. शासनाच्या मदत व पुनर्वसन कायद्यान्वये पुरात बळी पडलेल्यांना व्यक्ती व जनावरांना आर्थिक मदत करण्यात आलेली असली तरी, पुराचे पाणी घरे, दुकानांमध्ये शिरून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भरपाई करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडले गेले. (प्रतिनिधी)

Web Title: In the Chief Minister's court,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.