मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलसाठी पैसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:32 AM2018-12-25T01:32:04+5:302018-12-25T01:33:12+5:30
तीन महिन्यांपूर्वी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोटोकॉलसाठी मोठा खर्च झाल्याचे कारण दाखवून शहर धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकुनाकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त होऊनही सदर कर्मचाºयावर मेहेरनजर दाखविली जात असल्याने या संदर्भातील व्यक्त होणाºया संशयाला पुष्टी मिळू लागली आहे.
नाशिक : तीन महिन्यांपूर्वी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोटोकॉलसाठी मोठा खर्च झाल्याचे कारण दाखवून शहर धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकुनाकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त होऊनही सदर कर्मचाºयावर मेहेरनजर दाखविली जात असल्याने या संदर्भातील व्यक्त होणाºया संशयाला पुष्टी मिळू लागली आहे. विशेष म्हणजे दुकानदारांकडून खुलेआम पैशाची मागणी करणाºया या कर्मचाºयावर लाचलुपचपत प्रतिबंधक खात्याने एकदा कारवाई करूनही त्याची नेमणूक पुरवठा ‘खात्या’त करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे रेशन दुकानदारांचे चलन पास करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करणाºया पुरवठा कार्यालयातील अधीक्षक ए. डी. शेख याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या जागी नेमणूक झालेले अव्वल कारकून अनिल गायकवाड यांनीदेखील तोच कित्ता गिरविण्यास सुरुवात केल्यामुळे रेशन दुकानदारांसह धान्य वितरण कार्यालयात शासकीय कामासाठी येणारे नागरिक व खुद्द या कार्यालयातील कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.
गायकवाड यांच्यावर पैसे घेतल्याचा गुन्हा तसेच कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल दोन वेळा निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. अशा पद्धतीचे कृत्य असतानाही त्यांची नेमणूक पुरवठा खात्यात करून प्रशासनाने एकप्रकारे बक्षिसी व रानच मोकळे केल्याची भावना तक्रारदाराने व्यक्त केली आहे. गायकवाड यांना प्रशासनाकडून मिळणाºया अभयाबद्दल या संदर्भात थेट पुरवठामंत्री व सचिवांकडे तक्रार करण्यात येणार असून, त्यांच्या कृत्यामुळे महाराष्टÑाचे लोकप्रिय मुख्यमंत्री बदनाम होत असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
खुलाशावर समाधानाची बाब संशयास्पद
च्मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलसाठी खर्च करावा लागल्याचे कारण सांगून रेशन दुकानदारांकडून खुलेआम पैशांची मागणी करण्याबरोबरच पैशांशिवाय चलन पास न करण्याचे प्रकारही या कार्यालयात घडू लागले असून, नागरिकांशी व सहकाºयांशी होणाºया वादावादीचे प्रसंगही नियमित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांच्या वादग्रस्त वर्तणुकीच्या अनेक ध्वनिचित्रफितींच्या पुराव्यानिशी तक्रारी पुरवठा खात्याकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींबाबत गायकवाड यांच्याकडून खुलासाही मागविण्यात आला असून, त्यात त्याने मुख्यमंत्र्यांच्या नावे पैसे गोळा केल्याची कबुली दिल्याची चर्चा होत असली तरी, त्याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र त्याच्या खुलाशावर पुरवठा खात्याने समाधान मानण्याची बाब संशयास्पद आहे.