मुख्यमंत्र्यांची ३० रोजी नाशकात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:56 PM2020-01-20T23:56:04+5:302020-01-21T00:12:29+5:30
नाशिक विभागात सुरूअसलेले शासनाचे विविध प्रकल्प तसेच योजनांची सद्य:स्थिती यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३० रोजी नाशिकमध्ये येत असून, नियोजन भवन येथे मुख्यमंत्री जिल्हानिहाय योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.
नाशिक : नाशिक विभागात सुरूअसलेले शासनाचे विविध प्रकल्प तसेच योजनांची सद्य:स्थिती यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३० रोजी नाशिकमध्ये येत असून, नियोजन भवन येथे मुख्यमंत्री जिल्हानिहाय योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.
येत्या ३० रोजी नाशिक विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. नाशिकसह, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांमधील विकासकामांविषयी ते विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने जलयुक्त शिवार, पीकविमा आणि समृद्धी महामार्ग याविषयी अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. नियोजन समितीच्या बैठका झाल्यानंतर डिसेंबर अखेरीस कामांची परिस्थितीची माहिती जाणून घेतली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, शिवभोजन थाळी संदर्भातदेखील मुख्यमंत्री माहिती घेणार आहेत. आढावा बैठकीनिमित्त मुख्यमंत्री दुसऱ्यांना नाशिकमध्ये येत आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये पोलीस अकॅडमी येथील पदवीप्रदान सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन गेले आहेत. आढावा बैठकीच्या निमित्ताने दिवसभर ते नाशिकमध्येच राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्णांसाठी स्वतंत्र वेळ देण्यात आल्याने टप्प्याटप्याने पाचही जिल्ह्णांचा आढावा घेतला जाणार आहे.
उपमुख्यमंत्रीही ३१ रोजी दौºयावर
जिल्हा नियोजन आराखडा मंजुरीनंतर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार दि. ३० रोजी जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा आढावा घेणार आहेत. जिल्ह्णातील विकासकामांवर केवळ २० टक्के निधीच खर्च झाल्याने त्याचे पडसाद उपमुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत उमटण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणाºया बैठकीत वित्तमंत्री जिल्ह्यातील मंजूर निधी आणि कामांवरील खर्च यांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना तसेच दलितवस्ती, घरकूल योजनांचा आढावा घेणार आहेत. जिल्हासाठीचा मंजूर नियतव्यय, बीडीएस प्रणालीवर प्राप्त झालेला निधी आणि झालेला खर्च यांचा आढावा घेतला जाणार आहे.