चाफ्याच्या पाड्याची हरियाणाच्या अधिकाऱ्यांना मोहिनी
By admin | Published: May 28, 2017 12:22 AM2017-05-28T00:22:53+5:302017-05-28T00:23:13+5:30
निकवेल : बागलाण तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाफ्याचा पाडा (देवपूर) गावाला हरियाणा राज्यातील वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
निकवेल : बागलाण तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाफ्याचा पाडा (देवपूर) गावाला हरियाणा राज्यातील वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. चाफ्याचा पाडा हे १०० टक्के आदिवासी गाव असून, आदर्श गाव म्हणून शासनाचे अनेक पुरस्कार या गावाला प्राप्त झाले आहेत. त्या निमित्त या गावाने आदर्श निर्माण केल्याने महाराष्ट्रसह इतर राज्यातील अधिकारी व सरपंच या गावाला भेटी देण्यासाठी येत आहेत. नुकताच हरियाणा राज्यातील वर्ल्ड बँकेच्या वतीने अधिकाऱ्यानी दौरा करून गावाचे कौतुक केले. यावेळी हरियाणा राज्यातील पानिपतचे अतिरिक्त उपायुक्त अजय तोमर, भीमानी जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त गिरेंद्र खतारवाडा, कुरु क्षेत्र जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त रजिय मेहता, कर्नल जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त प्रियांका सोनिये तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शमशेर, रोदर गौरव, पानिपत, संदेश शर्मा, राजेश छात्रोली, राज कुमाररोदर, संजू कुमार, धर्मवीर सोनिपत्र, दिनेश वर्मा, नरेंद्र कुमार, रायपुर राणे, वर्ल्ड बँकेचे मुख्य अधिकारी अमित विश्वास व आदि अधिकारी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार चाफ्याचा पाडा गावातील ग्रामस्थांनी केला. हरियाणा राज्यात या गावाचा आदर्श ठेवून हरियाणा राज्यामध्ये चाफ्याचा पाडा गावासारखे विकासकामे करून एक आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. दौऱ्यामध्ये हरियाणा राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिरिक्त उपायुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरोबरच गटविकास अधिकारी, सरपंच असे पथक तयार करून आदर्श गाव चाफ्याचा पाडा गावाला भेट दिली. ग्रामस्थांनी सर्वप्रथम सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले. चाफ्याचा पाडा गावाच्या वतीने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी सरपंच काशीबाई बागुल, हिरामण बागुल, शांताराम बागुल, लक्ष्मण गांगुर्डे, नंदू गायकवाड, शंकर बागुल, वामन बागुल, बागलाण पंचायत समिती विस्तार अधिकारी व्ही.पी. जाधव, ग्रामसेवक एस.आर. देवरे, माजी पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, विकास वाघ, शाळेचे मुख्याध्यापक रमेश मोरे व शिक्षक दिलीप बिरारी, प्रभाकर बागुल, कैलास गांगुर्डे, वामन जगताप, अशोक बागुल, संजय बागुल, अंगणवाडी कार्यकर्ता कल्पना गायकवाड, ममता गायकवाड, पुष्पा चिंचोरे, सपना जगताप, रंजना देशमुख आदि ग्रामस्थ उपस्थित होते.