चिखलीकर ‘घबाड’ प्रकरणातील फिर्यादच गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:29 AM2018-07-13T01:29:55+5:302018-07-13T01:30:28+5:30

नाशिक : लाचलुुचपत खात्याच्या चौकशीत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याने राज्यभरात चर्चेत ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या लाच प्रकरणाच्या फाईलीतील मूळ फिर्यादच गहाळ झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

 Chikhlikar 'Ghabad' case was not found in the complaint | चिखलीकर ‘घबाड’ प्रकरणातील फिर्यादच गहाळ

चिखलीकर ‘घबाड’ प्रकरणातील फिर्यादच गहाळ

Next

नाशिक : लाचलुुचपत खात्याच्या चौकशीत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याने राज्यभरात चर्चेत ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या लाच प्रकरणाच्या फाईलीतील मूळ फिर्यादच गहाळ झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयाकडे फाईल सुपूर्द करताना पाहिले असता ही बाब उघड
झाली. अज्ञातांनी बनावट कागदपत्र फेरफार क रून फाईलमध्ये ठेवल्याचा संशय आहे.
बांधकाम विभागाचे निलंबित अभियंता सतीश मधुकर चिखलीकर यांच्यासह शाखा अभियंता जगदीश वाघ यांना २०१३ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांच्या निवासस्थानांची झडती घेतली असता कोट्यवधींचे घबाड हाती आले होते. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केले होते.
सरकार पक्षाकडून अ‍ॅड. अजय मिसर कामकाज चालवित होते. दरम्यान, या खटल्यात संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मिसर यांनी या खटल्याची फाईल न्यायालयाकडे सुपूर्द करण्यापूर्वी पडताळून बघितली असता त्यामध्ये फिर्यादी इरफान यासीन शेख याची स्वाक्षरी असलेले दस्तऐवज गहाळ असल्याचे निदर्शनास आले. तसेच पंचाची साक्ष असलेल्या दस्तऐवजांवर कुठल्याही प्रकारच्या स्वाक्षऱ्या नसल्याचेही आढळले. त्यामुळे मिसर यांनी सदर बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधीश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला सत्र न्यायालयाकडून जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा व प्रधान न्यायालयाच्या आदेशान्वये न्यायालयीन कर्मचारी दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. शेळके करीत आहेत.
मूळ मजकुरातही फेरफार
मूळ तक्रारीमधील मजकु रातही फे रफार करण्याचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारीची सही-शिक्का असलेली नकल प्राप्तीसाठी करण्यात आलेल्या अर्जाच्या नोंदवहीतही व्हाईटनरचा वापर करत खाडाखोड केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात संशयाची सुई न्यायालयीन कर्मचारी वर्गासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस आणि आरोपीवरही आहे.

Web Title:  Chikhlikar 'Ghabad' case was not found in the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा