सातपूरला चिकुन गुन्या, डेंग्यूची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:23+5:302021-07-15T04:12:23+5:30
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मधील विविध भागामध्ये चिकुन गुन्या, डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर ...
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मधील विविध भागामध्ये चिकुन गुन्या, डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यातील शिरकाव्यापेक्षाही चिकुन गुन्या, डेंग्यू यांसारख्या साथीच्या आजाराने जलदगतीने डोके वर काढले आहे. परिसरातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, पाय सुजणे, अंगदुखी यांसारखी आजाराची लागण झालेली आहे. कोरोना साथरोगप्रमाणेच नागरिक भयभीत झाले आहेत. या नागरिकांना वेळीच दिलासा देणे गरजेचे असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने वेळीच तातडीची उपाययोजना करून दिलासा द्यावा आणि चिकुन गुन्या, डेग्यूसदृश आजारावर नियंत्रण मिळवावे. सदर कामात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नगरसेविका हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर आदींनी आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.