पाडळी विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 06:10 PM2019-12-23T18:10:11+5:302019-12-23T18:10:46+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात बाल कारागिरांचा खाऊ बाजार अर्थात आनंद मेळावा उत्साहात पार पडला.
खाऊ मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध खाद्यपदार्थांचे दुकाने मांडण्यात आली होती. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी इच्छामणी पाववडा, गणेश भजी, संकल्प मिसळपाव, रघु बटाटावडा, इशा इडली सांबर, मेजवानी पाणीपुरी, मनशांती ओली भेळ, संदेश फरसाण, भाऊची मॅगी, चॉकलेट, कॅटबरी, बिस्कीट पुडा आदी खाद्यपदार्थ याबरोबर रस्सीखेच, पाण्यात नाणी टाकणे, रिंग फेकणे, गाढवाला शेपटी लावणे, स्त्रीला टिकली लावणे अशा मनोरंजनाच्या विविध खेळांचे मुलांनी आयोजन केले होते. याबरोबर मुलींनी विविध भाजीपाल्याची व फळांची दुकाने मांडली होती. प्रत्यक्ष सर्व स्टॉलला भेट दिल्यानतंर विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या कलेने मी भारावले असल्याचे जिल्हा परिदष सदस्य वनिता शिंदे यांनी सांगितले. आनंद मेळाव्याचा उद्देश मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी स्पष्ट केला.