बालकलाकार साहिल चौधरीलाआंतरराष्ट्रीय द्वितीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:21 PM2020-12-21T17:21:36+5:302020-12-21T17:22:52+5:30
दिंडोरी : नुकत्याच झालेल्या रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवल औरंगाबाद येथे भारताबरोबर १५ देशातील ६५० हून जास्त फिल्म सहभाग नोंदविला होता. या सर्व लघूपटातून एका सत्य घटनेवर आधारीत दिग्दर्शक बलराम माचरेकर निर्मित पाठलाग स्वप्नांचा या लघूपटामधील बाल कलाकार सुरगाणा तालुक्यातील चिकारपाडा (दे.) येथील साहिल चौधरी याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.
Next
ठळक मुद्देसर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.
दिंडोरी : नुकत्याच झालेल्या रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवल औरंगाबाद येथे भारताबरोबर १५ देशातील ६५० हून जास्त फिल्म सहभाग नोंदविला होता. या सर्व लघूपटातून एका सत्य घटनेवर आधारीत दिग्दर्शक बलराम माचरेकर निर्मित पाठलाग स्वप्नांचा या लघूपटामधील बाल कलाकार सुरगाणा तालुक्यातील चिकारपाडा (दे.) येथील साहिल चौधरी याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.
साहिल दोन्ही पायांनी अपंग होता परंतु आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून शिक्षक बलराम माचरेकर यांच्या प्रयत्नातून चालायला लागला, येवढेच नव्हे तर त्याने या लघू चित्रपटात काम केले आहे. (२१ साहिल चौधरी)