केमिकल ड्रमच्या आगीत भाजलेल्या मुलीचा मृत्यूं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:56 PM2018-08-31T22:56:35+5:302018-09-01T00:17:43+5:30
घरगुती वापरासाठी आणलेला प्लॅस्टिकचा केमिकलयुक्त ड्रम गरम चाकू ने कापत असताना लागलेल्या आगीत भाजलेल्या प्रतीक्षा गंगेश्वर पांडे (१६, रा. समर्थकृपा, हाजी चिकन सेंटरजवळ, कार्बन नाका, सातपूर) या मुलीचा गुरुवारी (दि़ ३०) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़
नाशिक : घरगुती वापरासाठी आणलेला प्लॅस्टिकचा केमिकलयुक्त ड्रम गरम चाकू ने कापत असताना लागलेल्या आगीत भाजलेल्या प्रतीक्षा गंगेश्वर पांडे (१६, रा. समर्थकृपा, हाजी चिकन सेंटरजवळ, कार्बन नाका, सातपूर) या मुलीचा गुरुवारी (दि़ ३०) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तर या घटनेत जखमी झालेली तिची आई व भाऊ यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ औद्योगिक वसाहतीतून पांडे यांनी घरगुती वापरासाठी प्लॅस्टिकचा
ड्रम विकत आणला होता़ गत शुक्रवारी (दि़ २४) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रतीक्षाची आई पूनम ही गरम चाकूने ड्रम कापत
होती़ केमिकलसाठी वापरात असलेल्या या ड्रमला गरम चाकूने कापत असताना अचानक भडका उडाला व त्यामध्ये पूनम पांडे, त्यांची मुलगी प्रतीक्षा व तिचा लहान भाऊ असे तिघेही गंभीररीत्या भाजले होते़