शिवडे येथे हौदात बुडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:56 PM2018-04-26T15:56:51+5:302018-04-26T15:56:51+5:30
सिन्नर : ताालुक्यातील शिवडे येथे आहाळात (हौदात) पडून सव्वा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सिन्नर : ताालुक्यातील शिवडे येथे आहाळात (हौदात) पडून सव्वा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शिवडे गावापासूनच जवळच बुवाजी बाबा मळा आहे. या मळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी आहाळ बांधण्यात आला आहे. सकाळी विद्युत जलपंपातून पाणी आहाळात पडत होते. स्वराज विजय गाडे हे सव्वा वर्षाचे बालक अंगणात खेळत-खेळत आहाळाजवळ गेले. पाणी खेळता-खेळता त्याचा तोल जावून तो आहाळात पडल्याचे सांगितले जात आहे. पाण्याची मोटार सुरु असल्याने त्याचा नाका-तोंडातून पाणी जावून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे शिवडे गावावर शोककळा पसरली.