Child Kidnapping Rumours :धुळ्याच्या घटनेची मालेगावात पुनरावृत्ती, मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 07:55 AM2018-07-02T07:55:22+5:302018-07-02T11:46:41+5:30
मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मालेगावमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे.
नाशिक (मालेगाव) - मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली आहे. मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून मालेगावात संतप्त जमावाने चार जणांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आझाद नगर परिसरात ही घटना घडली आहे. मुले पळवणारी टोळी समजून परभणी जिल्ह्यातील दोघांना जमावाकडून जबर मारहाण करण्यात आले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गजानन साहेबराव गिरे आणि सिंधूबाई साहेबराव गिरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.
दरम्यान, आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी शहरात मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा रात्री पसरताच जमाव अधिक आक्रमक झाला होता. जमावाने पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली. याममुळे मालेगावात नाशिकहून अधिक पोलिसांची कुमक मागवण्यात आली. यावेळी जमावावर सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.
Nashik Police had rescued a total of 5 people from a house in Azad Nagar in Malegaon last night, who were kept hostage on suspicion of child theft. More details awaited. #Maharashtrahttps://t.co/Q8ohKggGcI
— ANI (@ANI) July 2, 2018
दरम्यान, धुळ्यात मुले पळवणारी टोळी समजून संतप्त जमावानं 5 जणांना बेदम मारहाण केली, या घटनेत त्या पाचही जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
#Maharashtra: 5 people were lynched to death on suspicion of child theft in Rainpada village of Dhule dist y'day. Locals say 'There were rumours that they are child lifters&would kill villagers to take out their kidneys but question is who told them that. This incident is scary.' pic.twitter.com/nrAZYR1EPg
— ANI (@ANI) July 2, 2018
(धुळ्यात मुले पळवणारे समजून 5 जणांची हत्या)
दरम्यान, किडनी काढण्यासाठी लहान मुले पळविणारी टोळी गावात आल्याच्या अफवेचे भूत डोक्यात संचारलेल्या ग्रामस्थांनी रविवारी (1 जुलै) साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील आठवडा बाजारात 5 जणांना जबर मारहाण करून ठार केले. हे सर्व जण ज्योतिष सांगून उपजीविका करणारे भटक्या समाजातील होते. ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याहून आले होते. मारहाण करत या संशयितांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आले. तेथेच जमावाने दगडाने ठेचून, लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करीत त्यांना ठार मारले. दादाराव शंकर भोसले (४५), भारत शंकर भोसले (४५), राजू भोसले (४५), भारत माळवे (४७, सर्व रा. खवे ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि आगनू भोसले (२२, रा. मानेवाडी ता. मंगळवेढा) यांना दगड व काठ्यांनी ठेचून क्रूरपणे मारले.
क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करण्याआधीच पाचही जणांची जबर मारहाणीने ओळखूही येणार नाही, अशी रक्तबंबाळ अवस्था झाली होती. पोलीस येताच जमावाने त्यांच्याकडेही मोर्चा वळविला. मारहाणीत दोन पोलीस जखमी झाले. जमावातील काही जणांनी या घटनाक्रमाचा काढलेला व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात गावकऱ्यांच्या अंगात अक्षरश: राक्षस संचारल्याचे स्पष्ट दिसत होते. त्या व्हिडीओमधून ओळख पटवून संध्याकाळपर्यंत पोलिसांनी २० जणांना अटक केली.