महाश्रमदानात आबालवृध्दांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:59 PM2019-05-03T17:59:40+5:302019-05-03T17:59:53+5:30
सिन्नर : ‘महाराष्टÑ करतोय दुष्काळाशी दोन हात तुम्ही द्याल ना साथ’ हे ब्रिद उराशी बाळगून तालुक्यातील पाटोळे येथे पानी फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते.
सिन्नर : ‘महाराष्टÑ करतोय दुष्काळाशी दोन हात तुम्ही द्याल ना साथ’ हे ब्रिद उराशी बाळगून तालुक्यातील पाटोळे येथे पानी फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्टÑ दिनी आयोजित महाश्रमदानात आबालवृध्दांनी सहभाग घेऊन दुष्काळमुक्तीची शपथ घेतली.
महाराष्टÑातील सुमारे ६ हजारांहून अधिक खेडांमध्ये अभिनेता अमिर खान आणि पानी फाउंडेशनच्या संस्थापक किरण राव यांच्या मार्गदर्शनाने दुष्काळाशी दोन हात करण्याच्या हेतूने प्रत्येक भागातील खेड्याची पाण्याची पातळी वाढवून पाणीदार महाराष्टÑ घडविण्यासाठी जो उपक्रम राज्यभर घेतला जात आहे त्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील अनेक गावे सहभागी झाले आहेत. धोंडबार, वडझिरे, औंढेवाडी यांसह पाटोळेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुुुरु करण्यात आली आहे.