आर के एम विद्यालयात बाल हक्क सप्ताह संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 06:55 PM2019-11-30T18:55:53+5:302019-11-30T18:56:27+5:30
कळवण : बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर संयुक्त राष्ट्र अधिवेशनास ३० वर्षे पूर्ण झाल्याने त्या निमित्ताने कळवण येथील आर. के. एम.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बालहक्क सप्ताह संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य एल. डी. पगार यांनी दिली.

सप्ताहामध्ये कथाकथन, कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक एल. डी. पगार यांचा कथाकथन कार्यक्र म, पुनम गायकवाड यांच्या गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बालहक्क सप्ताहाच्या निमित्ताने विद्यालयात बालकांचे हक्क, अधिकार व सुरक्षितता याबाबत कळवणच्या पोलीसनिरीक्षक वर्षा निकम यांचे व्याख्यान झाले. बालकांचे आरोग्य व सावधानता, बालकांनी काय करावे व काय करू नये, मोबाईलचे दुष्परिणाम, वाहतूकीचे नियम, सुरक्षा व बालकांचे अधिकार या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. एम. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक देवरे, जे. आर जाधव, एम. पी. कोष्टी, शिक्षक - शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.