बालपण होतयं गुन्हेगारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:03+5:302020-12-27T04:11:03+5:30

बालगुन्हेगारीची समस्या भीषण बनू नये, यासाठी समाजानेही तितकेच जागरुक राहणे गरजेचे आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून अल्पवयीन मुलांमध्ये हाणामाऱ्या घडतात ...

Childhood was crime free | बालपण होतयं गुन्हेगारीमुक्त

बालपण होतयं गुन्हेगारीमुक्त

Next

बालगुन्हेगारीची समस्या भीषण बनू नये, यासाठी समाजानेही तितकेच जागरुक राहणे गरजेचे आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून अल्पवयीन मुलांमध्ये हाणामाऱ्या घडतात अन‌् मग पुढे जाऊन त्यामधून वैमनस्य जन्माला येते आणि गंभीर गुन्ह्यांना निमंत्रण मिळते. यामुळे समाजातील जबाबदार व्यक्तींनी एका जागरुक नागरिकाची भूमिका वेळोवेळी बजावणे आवश्यक ठरते. आपल्या आजूबाजूला असलेल्या मुलांचा मित्र परिवार आणि त्यांच्या सवयींकडे पालकांसह परिसरातील वडीलधाऱ्यांनीही ‘वॉच’ ठेवणे क्रमप्राप्त असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या वर्षभरात शस्रसंबंधीच्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन तर हाणामाऱ्यांच्या गुन्ह्यात ११, अत्याचाराच्या गुन्ह्यात १ आणि चोरीच्या गुन्ह्यात ३१ कमी वयाच्या मुलांचा समावेश राहिला आहे. एकूणच यावरून अल्पवयीन मुले हाणामाऱ्यांसह चोरीच्या गुन्ह्यांकडे अधिक वळाल्याचे दिसून येते. मागील वर्षी हाणामाऱ्यांसह चोरी आणि अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यांत बालगुन्हेगारांचा सहभाग अधिक राहिला होता. यावर्षी विधिसंघर्षित बालकांवर सर्वाधिक अंबडमध्ये दहा, पंचवटी, मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्रत्येकी नऊ गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षी या तीनही पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण अधिक होते.

-----आलेख-----

१८ वर्षांखालील मुलांवर दाखल गुन्हे

वर्ष - गुन्हे - संख्या

२०१९- खून - ०२

२०२०- खून- ००

-----------------------------

२०१९- शस्रसंबंधी- ०१

२०२०- शस्रसंबंदी- ०२

---------------------------

२०१९- मारामारी - १९

२०२०- मारामारी- ११

--------------------

२०१९- अत्याचार- ०५

२०२०- अत्याचार- ०३

--------------------

२०१९- चोरी- ९३

२०२०- चोरी- ३१

---------------------

२०१९- इतर- २४

२०२०- इतर- १८

-- नोव्हेंबरपर्यंत

------------------

----इन्फो----

कायदा काय सांगतो..?

सार्वजनिक वर्तनात पुन्हा गुन्हेगारीच्या घटना घडू नये, यासाठी बालकांची काळजी, संरक्षणासाठी कायद्यातील तरतुदींचा वापर कारून विधिसंघर्षित बालकांबाबत निर्णय घ्यावे, हा यामागील उद्देश्य आहे. बालगुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता सरकारी यंत्रणा प्रयत्न करते. नवीन तरतुदीनुसार गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात विधिसंघर्षित बालकांचा सहभाग आढळून आल्यास १६वर्षे वयाच्या पुढील बालगुन्हेगारांना सज्ञान समजून खटला चालविला जातो, असे सरकारी वकील ॲड. विद्या देवरे निकम यांनी सांगितले.

---इन्फो---

कुटुंबातील हिंसक वागण्याचाही होतो परिणाम

अल्पवयीन गुन्हेगारीमागे कौटुंबिक पार्श्वभूमी अनेकदा कारणीभूत ठरते. कुटुंबात जर संवाद तुटलेला असेल तर त्याचाही बालमनावर परिणाम होत असतो. सभोवतालच्या परिसरातील सार्वजनिक वर्तनामुळेही अनेकदा बालगुन्हेगारीला निमंत्रण मिळत असते. भौतिक गरजा, चंगळवादाचे आकर्षणापोटीदेखील बालके गुन्हेगारीकडे वळतात. पालकांकडून निर्बंध नक्कीच असले पाहिजे;मात्र त्यासाठी एखाद्या गुन्हेगारासारखी हिंसक शिक्षा देणे हेदेखील मुलांना गुन्हेगारीकडे जाण्यात प्रवृत्त करणारे ठरत असल्याचे मानसपोचार तज्ज्ञ डॉ. मृणाल भारद्वाज यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या मुलांकडून केला जाणाऱ्या वापराकडेही पालकांकडून अधूनमधून लक्ष दिले गेले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

---सुचना-----

डमी फॉरमेट : २६ चिल्ड्रेन क्राइम स्टोरी नावाने आर वर

फोटो : आर वर २६चिल्ड्रेन क्राइम नावाने सेव्ह आहे.

Web Title: Childhood was crime free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.