अभोण्यात कोरोनाबाधित पित्याच्या मृतदेहावर मुलांनीच केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:57 PM2020-09-23T22:57:59+5:302020-09-24T01:38:59+5:30
अभोणा : येथील कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये बाधित चिंतामण दामोदर कामळस्कर (७४) यांचा सोमवारी (दि. २१) सकाळी मृत्यू झाला. पालिका प्रशासनास रुग्णाच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडण्याचे निर्देश देत मदत मागितली. मात्र ग्रामपालिकेच्या ढिसाळ व वेळखाऊ दुर्लक्षामुळे मृतदेह दिवसभर रुग्णालयात पडून होता. प्रशासनाकडून दिवसभर टोलवाटोलवी करण्यापलीकडे कोणतेही सहकार्य न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या मृताच्या मुलांनीच पीपीई किट घालून मृतदेह खासगी ट्रॅक्टरद्वारे गिरणातीरी नेत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

कळवण, सुरगाणा व पेठ या तीन तालुक्यांतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या पन्नासपेक्षा अधिक रुग्ण येथे उपचार घेत आहेत. आजच्या या प्रकाराने येथे उपचार घेणारे रुग्णही भांबावले आहेत. ३ सप्टेंबरला जिल्हा उपरुग्णालयाचे नोडल आॅफिसर यांनी ग्रामपालिका प्रशासनास कोविड सेंटरमधील मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक पातळीवर करावयाच्या उपाययोजनांचे मार्गदर्शक परिपत्रक पाठविलेले आहे. मात्र, त्यानुसार सहकार्य न करता दिवसभर उडवाउडवीची उत्तरे देत मृताच्या नातेवाइकांना वेठीस धरण्याच्या या माणूसकीशून्य वर्तणुकीचा सर्वत्र निषेध होत आहे. जिल्हा प्रशासनाने येथे स्वतंत्र विद्युतदाहिनी व रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपालिकेचे माजी सदस्य सुनील खैरनार यांनी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे आठवडे बाजार तसेच सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले असून, एक दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाचे अजब उत्तर; विमा कवच नसल्याचे कारणग्रामपंचायतीचे प्रशासक कांतिलाल चव्हाण यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असता आम्हाला विमाकवच नाही. आमचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न करीत ट्रॅक्टरचालकासह कर्मचाऱ्यांनी येण्यास नकार दिल्याने आमचे हात बांधले गेले, तर कर्मचाºयांसाठी मागविलेले पीपीई किट रात्री उशिरा मिळाल्याचे ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव यांनी सांगितले.