मुले पळविणारी टोळीची ‘सोशल’ दहशत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:49 AM2018-07-02T00:49:13+5:302018-07-02T00:49:56+5:30

नाशिक : मुले पळविल्याचा संशयावरून धुळे जिल्ह्यात ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारी घडली़, तर तीन दिवसांपूर्वी याच कारणावरून नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे जमावाने तिघांना बेदम मारहाण करून इनोव्हा जाळून टाकली़ सोशल मीडियावर मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवरून मराठवाड्यातही मारहाणीच्या घटना घडल्या आहेत़ सोशल मीडियावरील ‘व्हॉट्स-अ‍ॅप’वर व्हायरल झालेले व्हिडीओ, या अफवांना कर्णोपकर्णी विशेषत: खेड्यांमध्ये मिळणारा प्रतिसाद यामुळे या घटना घडत आहेत़

Children fleeing 'Social' panic! | मुले पळविणारी टोळीची ‘सोशल’ दहशत !

मुले पळविणारी टोळीची ‘सोशल’ दहशत !

Next
ठळक मुद्देशहरासह जिल्ह्यात अफवा व्हिडीओ व्हायरल; कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती

विजय मोरे ।
नाशिक : मुले पळविल्याचा संशयावरून धुळे जिल्ह्यात ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारी घडली़, तर तीन दिवसांपूर्वी याच कारणावरून नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे जमावाने तिघांना बेदम मारहाण करून इनोव्हा जाळून टाकली़ सोशल मीडियावर मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवरून मराठवाड्यातही मारहाणीच्या घटना घडल्या आहेत़ सोशल मीडियावरील ‘व्हॉट्स-अ‍ॅप’वर व्हायरल झालेले व्हिडीओ, या अफवांना कर्णोपकर्णी विशेषत: खेड्यांमध्ये मिळणारा प्रतिसाद यामुळे या घटना घडत आहेत़ धुळे जिल्'ात जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्ती या सोशल दहशतीच्या बळी ठरल्या असून, नाशिक शहर व जिल्'ातही हे अफवेचे लोन वेगाने पसरत चालले आहे़
धुळे जिल्'ाच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणारी टोळी असल्याची अफवा कर्णोपकर्णी पसरली होती़ बाजाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या सोलापूरमधील पाच जणांना राइनपाड्यातील ग्रामस्थांनी अक्षरश: ठेचून मारून माणुसकीलाच काळिमा फासला़ नंदुरबारच्या म्हसावदमध्ये मुले पळविणारी टोळी असल्याच्याच संशयावरून तिघांना बेदम मारहाण करून त्यांची इनोव्हा कार जाळली़, तर मराठवाड्यातही संशयावरून मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ गत अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरून या टोळीबाबतचा संदेश व्हायरल केले जात आहेत़ विशेष म्हणजे मुलांची काळजी घेण्याबरोबरच हा व्हिडीओ व्हायरल करण्याचे आवाहन केले जाते़ साधारणत: मुलांच्या काळजीपोटी हे मेसेज फॉरवर्ड केले जात असले तरी त्याचे दुष्परिणाम या घटनांमुळे समोर आले आहेत़ मुले पळविणारी टोळी अशी समजूत करून घेत ग्रामस्थ अक्षरश: जीव जाईपर्यंत मारहाण करून कायदा हातात घेत असल्याची परिस्थिती आहे़ संबंधित संशयिताला पकडून पोलिसांच्या हवाली करणे अपेक्षित असताना मारून टाकण्यासारख्या घटना घडत आहेत़ या प्रकारच्या सर्वाधिक घटनांचे लोन हे खेड्यापाड्यातील आठवडे बाजारांमध्ये प्रामुख्याने परसत आहे़. विशेष म्हणजे पोलिसांनाही मारहाण केली जाते या अफवांचे लोन आता खेड्यानंतर शहरातही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरते आहे़ या अफवांबाबत पोलीस व शासनाच्या विविध यंत्रणांनी जनजागृती करणे गरजेचे आहे, अन्यथा राईनपाडा व म्हसावदसारख्या आणखी काही घटना घडण्याची शक्यता आहे़.
सोशल मीडियावर दाम्पत्याचे फोटो व्हायरल
सोशल मीडियावरील विशेषत: व्हॉट््सअ‍ॅपद्वारे एका दाम्पत्याचा फोटो व्हायरल केला जातो आहे़ या फोटोच्या खाली हे दाम्पत्य लहान मुलांना पळवून नेत असून, प्रारंभी भाडेतत्त्वावर घर घेतात, प्रेमसंबंध निर्माण करतात व हळूच घरातील लहान मुलांना पळवून नेऊन विकतात़ या फोटोतील दाम्पत्यापासून सावध रहा, अशा आशयाचे सूचना असतात़ विशेष म्हणजे संबंधित मेसेज फॉरवर्ड करणाºयास सत्यतेबाबत विचारणा केली असता तो कॅज्युअली एका ग्रुपवरून आला आणि सुरक्षितता म्हणून फॉरवर्ड केला, असे सांगितले जाते़. 
कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती
पालकांच्या दृष्टिकोनातून लहान मुलांचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा असतो़ सोशल मीडियावरील या व्हायरल संदेशांमुळे त्यांच्या जागरुकतेऐवजी भीतीच अधिक वाढते़ खेड्यापाड्यात तर अशा प्रकारच्या अफवा कर्णोपकर्णी सर्वाधिक वेगाने पोहोचतात़ त्यातच गावात वा बाजारात एखादा अनोळखी व्यक्ती आली की नागरिक मुले पळविणारा म्हणून त्याच्या पाठीमागे लागतात,तर जिवाच्या भीतीने तिही व्यक्ती पळते व गैरसमजातून त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली जाते़ नागरिकांनी अशाप्रसंगी कायदा हातात न घेता गावचा पोलीस पाटील वा जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देणे गरजचे आहे़
मुलं पळविणारी टोळी ही अफवा असून, नागरिकांनी यास बळी पडू नये़ विशेषत: खेड्या-पाड्यातील आठवडे बाजारात या अफवा सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल होत आहेत़ बाजारात वा गर्दीच्या ठिकाणी संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, कायदा हातात घेऊ नये़ अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल़ या अफवांचे लोन खेडोपाडी पसरू नये यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाºयांना पोलीसपाटील यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्याबाबत सांगितले आहे़
- संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण(फोटो : आर / फोटो / ०१ संजय दराडे या नावाने सेव्ह केला आहे़ )
अफवा पसरवू नका; पोलिसांना कळवा
सोशल मीडियावरील मुले पळविणाºया टोळीबाबतचा कोणताही व्हिडीओ वा संदेश व्हायरल करून अफवा पसरवून नये़ या प्रकारच्या अफवा पसरविणाºयांवर लक्ष ठेवण्याबाबत सायबर शाखेला सांगण्यात आले आहे़ त्यामुळे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अशाप्रकारचे अफवा पसरवू नका़ संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्या़
- डॉ.रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक (फोटो : आर / फोटो / ०१ रवींद्र सिंगल या नावाने सेव्ह केला आहे़)४२ सेंकदांचा व्हायरल व्हिडीओ संदेशतामिळनाडू पुलीस को एक कंटेनर से बच्चो की लाश मिली है। इन बच्चो के जिस्म का अंदर का हिस्सा निकाला गया है, जैसे किडनी, लिव्हर। तामिळनाडू पुलीसने बताया, इन सारे बच्चो को अलग-अलग देशोंसे किडनॅप करके लाया गया है। अपने घर के बच्चो को संभालो, उनका खयाल रखो। अपने सारे गु्रप मे ये मेसेज सेंड करो, इसको इतना फैलाव के किडनॅपर पकडने चाहीये, अगर जिसने य नही फैलाया वो अपनी मा का सपूत नही। अशाप्रकारचे काळजी घेण्याचे व भावनिक आवाहन करणारे तसेच व्हिडीओ व्हाट््सअ‍ॅपवरून व्हायरल करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे़
सिग्नलवरील भिक्षेकरी मुलांबाबत संशय
लहान मुलांना पळवून आणून अपंग केल्यानंतर भिकेला लावले जात असल्याची समजूतही नागरिकांमध्ये आहे़ मुलांप्रती जागरूक असलेल्या नागरिक सिग्नलवरील भिक्षेकरी वा विविध वस्तुंची विक्री करणाºया लहान मुलांकडे नेहमीच संशयाने बघतात़ काही दिवसांपूर्वीच न्यायालयाच्या आदेशाने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरात मोहीम राबवून सुमारे १६५ भिक्षेकरी व लहान मुलांना पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल केले होते़

Web Title: Children fleeing 'Social' panic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा