स्फोटात दाम्पत्यासह मुले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:20 AM2019-11-17T00:20:31+5:302019-11-17T00:21:35+5:30

एकलहरारोड संभाजीनगर भोरमळ्यात भाडेतत्त्वावरील खोलीत राहणाऱ्या नरसिंग कांबळे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात पती-पत्नीसह तीन लहान मुले भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 Children injured in blast | स्फोटात दाम्पत्यासह मुले जखमी

स्फोटात दाम्पत्यासह मुले जखमी

Next

नाशिकरोड : एकलहरारोड संभाजीनगर भोरमळ्यात भाडेतत्त्वावरील खोलीत राहणाऱ्या नरसिंग कांबळे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात पती-पत्नीसह तीन लहान मुले भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकलहरारोड ट्रॅक्शनसमोर संभाजीनगर येथील भोरमळ्यात कृष्णा पंडित यांच्या समोरासमोर सहा छोट्या खोल्या आहेत. तीन खोल्या रिकाम्या असून, एका खोलीत स्वत: मालक कृष्णा पंडित राहतात. तर भाडेतत्त्वावर एका खोलीत सेन्ट्रिंग काम करणारे नरसिंग रंगनाथ कांबळे (४४), पत्नी नम्रता (४०), मुलगा निखिल (६), मुलगी नेहा (४), अथर्व (३) राहतात. तर दुसºया खोलीत भाड्यातत्त्वावर मुस्लीम कुटुंबीय राहण्यास असून, गेल्या १० दिवसांपासून ते बाहेरगावी गेले आहेत.
नम्रता कांबळे या पहाटे ५ च्या सुमारास उठून मुलांची शाळा सुरू झाल्याने व पतीला कामावर जायचे असल्याने स्वयंपाकाची तयारी करत होत्या. पीठ मळून झाल्यानंतर पाणी गरम करण्यासाठी त्यांनी गॅस शेगडी काड्यापेटीने पेटविण्याचा प्रयत्न करताच रेग्युलेटरमधून गळती होऊन खोलीत पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याने मोठा आवाज झाला. यामुळे आजूबाजूचे झोपलेले नागरिक जागे झाले. मात्र खोलीत गळती झालेल्या गॅसचा स्फोट झाल्याने नम्रता कांबळे या संपूर्ण भाजून गंभीर जखमी झाल्या. तर खोलीत झोपलेले पती नरसिंग, मुले निखिल, नेहा, अथर्व हे गॅसच्या भडक्याने व कपड्याला आग लागून तेही जखमी झाले. स्फोटात छताचा पत्रा फाटला असून, भिंतींना तडे व खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. तर स्फोटामुळे आग लागल्याने जखमींच्या अंगावरील कपडे, गादी आदी जळाले आहेत. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक जागे होऊन घटनास्थळी धावत आले.
तर तेथुन जवळच राहाणारा जखमी नम्रता यांचा भाऊ नितीन भीमराव सूर्यवंशी यांने लागलीच एका खाजगी वाहनातून पाचही जखमींना बिटको रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळती होऊन झालेला स्फोट व लागलेली आग यामध्ये नम्रता ७० टक्के, नरसिंग ४० टक्के, अथर्व २५ टक्के, नेहा ३५ टक्के, निखिल १५ टक्के भाजला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गॅस गळतीची दुर्घटना टळली असती...
कांबळे यांच्या घरात गॅस सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून दोन-तीन दिवसांपासून गॅस गळती होत असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितले. तसेच जखमी नम्रताने भाऊ नितीन यालादेखील घटना घडल्यानंतर सांगितले. जखमी नम्रता या गंगापूर रोडवरील सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये लहान मुलांना सांभाळण्याचे काम करतात. गॅस गळतीबाबत नम्रता या शुक्रवारी संबंधित गॅस एजन्सीच्या दुकानात गॅस गळतीबाबत सांगण्यास जाणार असल्याचे भाऊ नितीन याने सांगितले. मात्र पहाटेच सदरची दुर्दैवी घटना घडली.

Web Title:  Children injured in blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.