भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मुलांना मुल्यशिक्षण देणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 07:31 PM2021-01-20T19:31:32+5:302021-01-21T00:45:39+5:30
सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले.
सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले.
सटाणा येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्रात श्री स्वामी समर्थ सेवेकरी हितगुज मेळाव्यात ते बोलत होते.
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात दिन दुबळ्यापासुन तर सर्वधर्मियांचे हित जोपासले जाते. जगाच्या कल्याणासाठी हा सेवा मार्ग यशस्वीपणे सेवेकर्यांनी स्विकारला आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात करोना काळात देखील अतिशय परोपकारी काम करण्यात आले आहे. आगामी काळ देखील अतिशय धोक्याचा असुन सर्वधर्मीय बांधवांनी वाटचाल करित असतांना काळजी घ्यावी असेही आवाहन आण्णासाहेब मोरे यांनी केले. तसेच संस्कृतीचे पारंपारिक सण, घरातील देव्हारा, वास्तुशास्त्र, प्रश्नोत्तर, पांरपारीक शेती व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले.
सटाणा स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने जेष्ठ सेवेकरी पंडीत सोनवणे, अशोक चव्हाण, अरूण इंगळे, केंद्रप्रमुख किरण नांद्रे, रणजीत पवार, राकेश येवला यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास जिल्हाप्रमुख केशव घोडे, तालुका प्रमुख नितीन वैष्णव, वंदना खैरनार, रोहित रौंदळ, उत्तम सोनवणे, अनिल सोनवणे, दत्ता शेवाळे, मंगेश सोनवणे, यश पवार, यशवंत जाधव, हेंमत देसले, भिका अहिरे, प्रविण जाधव, प्रविण सोनवणे, मोहन शिरापूरे, रमेश कुटे, चेतन शेवाळे, मयुर पवार, राजाराम वाघ, सोमा अहिरे, राजेश जगताप, डॉ. दिकपाल गिरासे, निलेश चव्हाण, आयुष येवला, उदय सोनवणे, डॉ. राजेंद्र नेरकर, उषा अमृतकार, रजनी कापडणीस, ललीता इंगळे, कल्पना नांद्रे, तनुजा नांद्रे,मनिषा पवार, अलका बेडीस, छाया अहिरे, कविता जाधव, पल्लवी बागड, सुवर्णा जंगम, सोनाली येवला, सुवर्णा बागड, मनिषा अहिरे ,लिलावती दशपुते, मिना बिरारी, आशा अहिरे, आशा देवरे, मिना अमृतकार, मानसी खैरनार, शंकुतला शिंदे, सायली येवला, मयुरी कासार आदीउपस्थित होते. के.डी.मोरे यांनी आभार मानले.