मुलांनी दिला ‘गोदा स्वच्छते’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:39 AM2017-10-01T00:39:08+5:302017-10-01T00:39:13+5:30

येथील सुखदेव शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपट्यांच्या पानावर गोदावरी नदीच्या स्वच्छतेच्या संदेश लिहून गोदावरी नदी परिसरात दसºयाच्या पार्श्वभूमीवर आपट्याच्या पानांचे वाटप केले.

 Children's Message 'Goddess Cleanliness' | मुलांनी दिला ‘गोदा स्वच्छते’चा संदेश

मुलांनी दिला ‘गोदा स्वच्छते’चा संदेश

Next

इंदिरानगर : येथील सुखदेव शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपट्यांच्या पानावर गोदावरी नदीच्या स्वच्छतेच्या संदेश लिहून गोदावरी नदी परिसरात दसºयाच्या पार्श्वभूमीवर आपट्याच्या पानांचे वाटप केले.  वाढत्या शहरीकरण व औद्योगिक वसाहतींमुळे जीवनदायिनी असलेल्या नद्यांच रूप बेरूप होत चालले आहे. गंगा, तापी, नर्मदा, कृष्णा व गोदावरी या भारतातील प्रमुख नद्या मानल्या जातात. या नद्या प्रदूषणापासून वाचाव्यात म्हणून अनेक स्तरावर प्रयत्न, प्रबोधन होत आहेत. हाच मुद्दा लक्षात घेऊन दसºयाच्या पार्श्वभूमिवर इंदिरानगर येथील सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिरच्या वतीने आपट्याच्या पानांवर गोदावरी नदी स्वच्छते संदर्भात घोषवाक्य लिहून गोदावरी तीरावरील रामकुंड परिसरातील भाविक, व्यावसायिक, पर्यटक, भाजीविक्रे ते यांना वाटप करून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आपट्याच्या पानांवर ‘मांगल्याचे तोरण बांधू दाराला, स्वच्छ राखू गोदावरीला’, ‘दसरा सणाला आपट्याचे पान, गोदा रक्षणाची घेऊया आण’, ‘नदीपात्रात टाकू नका घाण, गोदामाई आपल्या मातेसमान’, ‘गोदावरी म्हणजे पवित्र जल- करू नका तिचे रूप अमंगल’, ‘गोदापात्र असेल स्वच्छ-छान, देशभरात वाढेल नाशिकची शान’, ‘पानवेलींचा काढून फास, गोदावरीला घेऊ द्या मोकळा श्वास’असे अर्थपूर्ण संदेश लिहिण्यात आले होते. यावेळी सुखदेव एज्यु.संस्थेचे सरचिटणीस संजय काळे, मुख्याध्यापक नितीन पाटील, प्राचार्य बाबासाहेब खरोटे, कविता पवार, मनीषा बोरसे, सुनील जाधव, संदीप नागरे, भारती जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
शिशुविहार शाळेत दसºयानिमित्त पाटीपूजन
सी.एच.एम. इ. सोसायटी संचालित शिशुविहार इंग्रजी माध्यमामध्ये दसरा व पाटी पूजनाचा कार्यक्र म साजरा करण्यात आला. मुलांनी झेंडूच्या फुलांचे तोरण लावून आपल्या वर्गाला सुशोभित केले. मोठ्या गटातील मुलांनी फुलांची व पानांची रांगोळी काढली. विशाखा शुक्ल, नेहा सोमण यांनी दसरा व पाटीपूजन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

Web Title:  Children's Message 'Goddess Cleanliness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.