वरखेड्याच्या गल्लीत भरते मुलांची शाळा! शाळा बंद, शिक्षण सुरू : परिसरात उपक्रमाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 AM2020-12-03T04:24:51+5:302020-12-03T04:24:51+5:30
वरखेडा : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जातात. परंतु सर्वच मुले ...
वरखेडा : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जातात. परंतु सर्वच मुले ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नसल्याने दिंडोरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील वरखेडा येथील गल्लीत दोन मुलींनी मुलांसाठी शाळेचे वर्ग भरविल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
कोराेनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच शाळा बंद आहेत. कुठे ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जातात तर काही मुले आई, वडील मोलमजुरीला जात असल्याने गल्लीबोळात भटकत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. गल्लोगल्लीत आरडाओरड करीत फिरत असलेल्या मुलांना जमवून सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या गायत्री वाघले, गौरी पवार या विद्यार्थिनींनी ‘आम्ही तुम्हाला शिकवतो चला’ असे समजावून सांगत व दरवाजाचा फळा करून शक्य असलेले पाढे, गणित, इंग्रजी स्पेलिंग यासारखे धडे त्यांना देत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वर्गात गोंधळ घालणारी मुले कंटाळलेली असल्याने कुणीतरी आपल्याला शिकवत असल्याच्या आनंदाने या वर्गात निमूटपणे लक्ष देत असल्याचा अनुभव येत आहे.
‘बेंच नको, छत नको हवे मनापासून शिकवणारे शिक्षक’ अशा गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाने मुलेही घराच्या जवळच असलेल्या या शाळेत मनापासून रमताना दिसत आहेत.
===Photopath===
011220\01nsk_31_01122020_13.jpg
===Caption===
वरखेडा येथे घराच्या दरवाजाचा फळा करुन मुलांना गल्लीतच शिकवताना गौरी पवार.०१ वरखेडा १