शरद पवार स्कूलमध्ये बाल वैज्ञानिकांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 04:51 PM2018-12-15T16:51:58+5:302018-12-15T16:52:21+5:30
टेक्नोवेशन-४ : साठ विज्ञान उपकरणांचा सहभाग
कळवण : विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे ‘टेक्नोवेशन-४’ मध्ये शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शालेय विद्यार्थांनी विज्ञानविषयक उपकरणे तयार करून आपल्यातील कल्पकतेचे प्रदर्शन घडविले आहे. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन चांदवड येथील नेमिनाथ जैन महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पाटील यांच्या हस्ते झाले.
सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मानूर ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरसे उपस्थित होते. यावेळी डॉ. मनोज पाटील यांनी सांगितले, विज्ञानाचा शोध हे मानवासाठी उपकारक असावे , त्याचा दुरु पयोग करून निसर्गास व मानवास हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे . कुठल्याही वैज्ञानिक शोधाच्या मागे निसर्गाचा हात असतो. त्यामुळे विज्ञानासोबत पुढे जातांना निसर्गाच्या रक्षणाचेही भान राखण्याचेही त्यांनी आवाहन केले. ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरसे यांनी शाळेने अशा प्रकारचे स्तुत्य उपक्र म राबवणे ही काळाची गरज असून , विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला संधी देत असल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार, सचिव अनुप पवार, प्राचार्य बी. एन. शिंदे, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल, समन्वयक विश्वेशरण, विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश लांडगे , मंगेश भावसार तसेच शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते .
विविध उपकरणांचे प्रदर्शन
विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ६० पेक्षा जास्त समाजोपयोगी विज्ञान उपकरणे तयार करून मांडली आहेत. त्यात प्रामुख्याने, अॅक्सीडेंट प्रिव्हेंन्शन सिस्टम फ्लड अलार्म व रेस्क्यू सिस्टीम, विन्ड एनर्जी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट, कार्बन कलेक्टर, रोड क्लिनर, सोलर एरिगेशन प्रोसेस, पोपकोर्न मेकर , हायडॅÑलिक ब्रिज सारखे अनेक उपयुक्त उपकरणांचा समावेश आहे. सदर विज्ञान उपकरणे तयार करण्यासाठी शाळेचे विज्ञान शिक्षक अविनाश लांडगे , सुनिल नालकर, मिलिंद पोखरकर, ईश्वर पाटील, राहुल कलंके यांचे मार्गदर्शन केले .