चावी गिळल्याने बालकाचा मृत्यू

By admin | Published: November 17, 2016 11:35 PM2016-11-17T23:35:31+5:302016-11-17T23:45:11+5:30

चावी गिळल्याने बालकाचा मृत्यू

The child's death by swallowing the chak | चावी गिळल्याने बालकाचा मृत्यू

चावी गिळल्याने बालकाचा मृत्यू

Next

 मालेगाव : बालकाचे नेत्रदान करून जाधव परिवाराने ठेवला समाजासमोर आदर्शसंगमेश्वर : खेळण्यातील गाडीची चावी गिळल्याने चारवर्षीय बालकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी मालेगाव शहरात घडली. या गंभीर परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जोपासत जाधव परिवाराने नेत्रदानाचा निर्णय घेतला. नेत्रदानाच्या प्रक्रियेनंतर शोकाकुल वातावरणात बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मालेगाव शहरातील भाऊसाहेब जाधव हे सटाणा नाका भागातील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. बुधवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा अनंत (४) हा आपल्या भावंडांबरोबर खेळत होता. खेळण्यातील छोट्या गाडीची चावी त्याने तोंडात धरली. ती अनावधानाने गिळली गेली. ती चावी श्वासनलिकेत अडकल्याने त्याला श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्याने त्याने स्वयंपाकगृहात काम करीत असलेल्या आईकडे धाव घेतली. त्याच्या आईने व इतर भावडांनी गिळालेली वस्तू काढण्याचा प्रयत्न केला व तत्काळ शहरातील डॉक्टरांकडे धाव घेतली; मात्र गिळलेली
चावी श्वासनलिकेत अडकल्याने त्याला श्वास घेण्यास खूपच अडचण येऊ लागली. त्यातच त्याचा उपचारापूर्वी गुदमरून मृत्यू झाला. अनंतच्या मृत्यूने जाधव परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही जाधव परिवाराने आपल्या लाडक्याचे नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्याचे दोन्ही नेत्र रोटरी आय हॉस्पिटलकडे दान करण्यात आले. रात्री साडेबारा वाजता शोकाकुल वातावरणात मुंगसे, ता. मालेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
भाऊसाहेब जाधव यांना पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा अनंत हा येथील युरो किड्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ज्युनिअर के.जी.च्या वर्गात शिकत होता. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत बालकाचा जन्म चतुर्थीला झाला होता व त्याचा मृत्यूही चतुर्थीच्या आदल्या दिवशीच  झाला. (वार्ताहर)

Web Title: The child's death by swallowing the chak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.