‘चिल्लर’बाज उमेदवारांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:19 AM2019-10-01T01:19:16+5:302019-10-01T01:19:34+5:30

‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात ‘चिल्लर’च्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याचा भन्नाट प्रसंग आहे. या प्रसंगातून कलावंत मकरंद अनासपुरे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील याच प्रसंगाची कॉपी करून अनेक स्टंटबाजांनी निवडणुकीत प्रसिद्धी मिळविली आहे.

 The 'Chiller' candidate will have the arc to sit | ‘चिल्लर’बाज उमेदवारांना बसणार चाप

‘चिल्लर’बाज उमेदवारांना बसणार चाप

Next

नाशिक : ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात ‘चिल्लर’च्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याचा भन्नाट प्रसंग आहे. या प्रसंगातून कलावंत मकरंद अनासपुरे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील याच प्रसंगाची कॉपी करून अनेक स्टंटबाजांनी निवडणुकीत प्रसिद्धी मिळविली आहे. यंदा मात्र प्रसिद्धीचा असा फंडा वापरणाऱ्यांना चाप बसू शकतो. कारण नाणे कायदा २०११ नुसार फक्त हजार रुपयांची चिल्लरच अनामत रक्कम म्हणून अधिकृत चलन ग्राह्य मानली जाते.
विधानसभेची निवडणूक लढविणारे सर्वच उमेदवारीसाठी गंभीर असतात, असे नाही तर स्वत:त प्रसिद्धी मिळविण्याचा फंडा म्हणूनही निवडणुकीकडे पाहणारे अनेक नमुने असतात. अगदी अनामत रक्कम भरण्यापासून ते प्रचाररातील वेगळेपणातून ही मंडळी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी निवडणुकीसारख्या माध्यमाचा वापर करताना दिसून येतात. यातूनच अनामत रक्कम म्हणून चिल्लर भरण्याचा फंडा वापरून प्रसिद्धी अनेकांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेत मिरवून घेतले आहे. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेकांनी ‘चिल्लर’चा वापर केला. परंतु या प्रकाराला आता आळा बसणार आहे. नाणे कायमदा २०११चे कलम ६ (१) नुसार केवळ एक हजाराची चिल्लरच चलन म्हणून आहे.
विधानसभेसाठी दहा हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला पाच हजार रुपये इतकी अनामत रक्कम जमा करावी लागते. अशावेळी अनेक उमेदवार चिल्लरच्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याची शक्यता असते. इतकी मोठी रक्कम चिल्लरच्या स्वरूपात दिल्यास संबंधित यंत्रणेचा वेळ वाया जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची अनामत रक्कम तुलनेत कमी असते, संबंधिताने मोठ्या रकमेत चिल्लर दिली तर यंत्रणा वेठीस धरली जाते. नाणे कायद्यामुळे या प्रकारास केवळ चापच नव्हे तर सदर प्रकार कायमस्वरूपी बंद होऊन स्टंटबाज वठणीवर येऊ शकणार आहेत.
प्लॅस्टिक पिशवी वापरली तर दंड
राज्यात प्लॅस्टिकला बंदी असल्यामुळे अनामत भरण्यासाठीची रक्कम प्लॅस्टिकच्या पिशवीत आणल्यास संबंधित उमेदवाराला प्लॅस्टिक वापराबद्दल दंड होऊ शकतो. नेवासा मतदारसंघात दहा हजारांची रक्कमच चिल्लरच्या स्वरूपात प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन येणाºया स्टंटबाज कथित व्यक्तीस पाच हजारांचा दंड भरावा लागला आहे. विशेष म्हणजे हा दंड नोटांच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला. अर्थात संबंधित यंत्रणा कशाप्रकारे कारवाई करणार यावर हे अवलंबून आहे.

Web Title:  The 'Chiller' candidate will have the arc to sit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.