चिमणपाडा परिसरात उजाड रानावर फुलविले नंदनवन....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 09:51 PM2020-03-20T21:51:08+5:302020-03-21T00:33:17+5:30

दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर्गसंपदा जोपासली जाऊ शकते हे चिमणपाड्याच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

Chimnapada area blossoms in the desert wilderness paradise ....! | चिमणपाडा परिसरात उजाड रानावर फुलविले नंदनवन....!

चिमणपाडा परिसरात उजाड रानावर फुलविले नंदनवन....!

Next
ठळक मुद्देसंत तुकाराम वनग्राम योजना अधिकारी अन् ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी जगविली वनसंपत्ती

भगवान गायकवाड ।
दिंडोरी : दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर्गसंपदा जोपासली जाऊ शकते हे चिमणपाड्याच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे कार्यरत असलेले तत्कालीन वनाधिकारी आर. डी. सुद्रीक यांच्यासह सहकारी वनपाल आर. व्ही. देवकर, विष्णू राऊत आदींनी गावोगावी जाऊन नागरिकांना वनसंवर्धनाचे फायदे सांगत वनसंवर्धन करण्यास प्रोत्साहन दिले. यासाठी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.
वनपरिक्षेत्रात संत तुकाराम वनग्राम योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभाग व वनव्यवस्थापन यांच्यामार्फत समिती स्थापन करण्यात आली आहे. चिमणपाडा येथे वनसंरक्षण संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव आर. व्ही. देवकर व सदस्यांची नियुक्ती करत कामकाज सुरू केले. त्यात सरपंच, पोलीसपाटील व सर्व गावकऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले.
ननाशी वनपरिक्षेत्रातील दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा (कवडासर) २५३.३५४ हेक्टर वनक्षेत्रात वनसंवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. कुºहाडबंदी, चराईबंदीची बंधने घालण्यात आली. सदर क्षेत्र उत्कृष्टरीत्या सांभाळण्यासोबतच सदर समितीमार्फत सन २०११-१२ मध्ये कम्मा या योजनेंतर्गत ३० हेक्टर क्षेत्रावर रोपवन करण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जल व मृद संधारणाची कामे करण्यात आली. साग व विविध औषधी वृक्षांचे संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यात आले. समितीने वनसंरक्षण, संवर्धन, विकास यासाठी उत्कृष्ट काम केल्याने संत तुकाराम वन योजनेमध्ये गावाची निवड होत जिल्ह्यात अव्वल होण्याचा मान मिळवला असून, चिमणपाडा आता राज्यस्तरीय स्पर्धेत पोहचले आहे.
गावकºयांनी विझवला वणवा
एकेरात्री अचानक या जंगलात वणवा लागला ही बाब गावकºयांना समजताच आबालवृद्ध, महिला-पुरु षांनी जंगलाकडे धाव घेत काही वेळात वणवा विझवत वनाचे संवर्धन केले. पूरक कामातून मिळालेले एक लाख रुपयांतून गावकºयांनी सोलर बसवले. वनविभागाने प्रोत्साहन देण्यासाठी काही कामे हाती घेतली. ती ग्रामस्थांनी केली त्यातून एक लाख निधी जमा झाला. गावकºयांनी त्यातून गावात सोलर दिवे बसविले आहेत.

Web Title: Chimnapada area blossoms in the desert wilderness paradise ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.